Eknath Shinde News in Marathi, Maharashtra Assembly Session  Saam Tv
मुंबई/पुणे

पोटच्या मुलांच्या आठवणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भर सभागृहात रडू कोसळलं

मी वडील म्हणून कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला वेळ दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बंड केल्यानंतर त्या काळात झालेल्या टीकेवरून विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात आक्रमकपणे उत्तर देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोटच्या मुलांच्या आठवणीत रडू कोसळले. मी वडील म्हणून कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला वेळ दिला. शिवसैनिकांना कुटुंब मानलं. माझ्या आयुष्यात डोळ्यांसमोर दोन मुलं गेली. त्यावेळी आनंद दिघे यांनी मला आधार दिला, असं सांगतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना रडू कोसळलं.(Eknath Shinde News in Marathi)

आपल्या भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपले राजकीय गुरु आनंद दिघे (Anand Dighe) यांनी आधार दिल्याच्या आठवणी सांगितल्या. मुख्यमंत्री म्हणाले, 'माझं संपुर्ण कुटुंब उद्धवस्त झाल्यामुळे मी फक्त घरच्यांसाठी जगणार असं ठरवलं पण दिघे साहेब माझ्या घरी आले आणि त्यांनी मला सांगितलं हे दु:ख पचव.(Maharashtra Assembly Session News updates)

पाहा व्हिडीओ -

तुला दुसऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसावे लागणार आहेत. त्यांनी त्यावेळी सांगितलं दुसऱ्यांसाठी जगावं लागेल. दिघे साहेबांनी मला सभागृह नेता बनवलं. तेंव्हापासून मी मागे वळून पाहिलं नाही. दिवस रात्र एक केला आणि वेड्यासारखं कामाला लागलो. मी खूप मेहनत केली, ठाण्यातील (Thane) वागळे इस्टेडमध्ये अनेक लेडीज बारचा सुळसुळाट होता, तेंव्हा तिथे पैशांची उधळपट्टी चालायची, अनेक महिला मला येऊन म्हणायच्या तुमच्या संघटनेत एवढे तरुण आहेत काहीतरी करा.

त्यावेळी मी पोलीसांना (Police) अर्ज केले विनंती केली मात्र काही झालं नाही. त्यामुळे मी स्वत: १६ लेडीज बार तोडले असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. शिवाय त्या प्रकरणी आपल्यावरती शंभर हुन अधिक केसेस झाल्या मात्र मी घाबरलो नाही. दरम्यान, त्यावेळी गॅंगवॉर सुरु होतं. त्या लोकांनी मला मारायचा देखील प्लॅन केला होता. हे सर्व मी दिघे साहेबांना सांगितलं, तेंव्हा त्यांनी शेट्टी लोकांना बोलावलं आणि सांगितलं एकनाथला काय झालं तर बघा, असा दम त्यांनी शेट्टी लोकांना दिल्यामुळे त्या लोकांनी माझ्याविरोधी कारवाई बंद केल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, त्यांनी पुढे सांगितलं, 'आम्ही संघटनेचे काम करत असतानाच दिघेसाहेब गेले तेंव्हा मात्र आम्ही कोलमडून गेलो. कारण, दिघे हे आमचे बाप होते, आमचा आधार गेला. पण त्यावेळी मी ठरवलं ही वेळ कोलमडण्याची नाही. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये उद्रेक झाला तो दिघे साहेबांच्या प्रेमापोटी लोकांमध्ये उद्रेक केला. हॉस्पिटलची तोडफोड झाली. मी होतो म्हणून सिलेंडर स्फोट झाला नाही, नाहीतर त्या स्फोटामध्ये १०० ते १५० लोक मेले गेले असते असते असंही त्यांनी सांगितलं.

दीडशे लोकांवर कारवाई झाली, मात्र, हे कोणी जाणीवपूर्वक केलं नाही तर ते प्रेमापोटी झाल्याचं पोलिसांना सांगितलं. नंतर या सर्वांना मी कोर्टात हजर केलं. कोर्ट प्रक्रिया केली. दिघेसाहेबांच्या जाण्यामुळे सर्व लोकांना वाटलं ठाण्यातील शिवसेना संपून जाईल, बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) देखील चिंता होती की सेना संपेल मात्र मी सर्वांना केसमधून बाहेर काढलं आणि मी सेना वाढवली. आनंद दिघेंच्या पुण्याईने ठाणे, पालघर सह अनेक पालिकांमध्ये सेनेचे महापौर, खासदार, आमदार सभापती सध्या शिवसेनेचे असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT