मुंबई: आंतरराष्ट्रीय गुंड दाऊद इब्राहिम निकटवर्तीय मानला जाणारा छोटा शकील विषयी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छोटा शकीलने (Chhota Shakeel) मुंबईबरोबरच (Mumbai) भारतातील प्रमुख शहरात दहशतवादी (Terrorist) कृत्ये करण्याकरिता पैसा पेरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याकरिता हवाला रॅकेटचा उपयोग करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती 'एनआयए'च्या (NIA) तपासात आली आहे. दाऊदसह त्याच्या हस्तकांनी मोठ्या प्रमाणात हवाला रॅकेटद्वारे पैसा उभा केला होता.
हे देखील पाहा-
या पैशांचा उपयोग करून देशात महत्त्वाच्या काही ठिकाणी बॉम्बस्फोट (bombing) घडवणे, महत्त्वाच्या राजकीय (Political) नेत्यांच्या हत्या करणे आणि या माध्यमातून नागरिकांमध्ये दहशत (Panic) निर्माण करण्याचा कट आखण्यात आला होता. याविषयी गुप्त माहिती मिळल्याने मुंबईत (Mumbai) छापे टाकण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनकडून देण्यात आली आहे. दरम्यान, एनआयएने मुंबईमध्ये एकाचवेळी २० ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
यामध्ये वांद्रे, नागपाडा, बोरिवली, गोरेगाव, परळ, सांताक्रूझ या ठिकाणांचा समावेश होता. दाऊदसाठी काम करणारे भाडोत्री नेमबाज, हवाला व्यवहार करणारे व्यावसायिक, स्फोटक तयार करणाऱ्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. या छाप्यात छोटा शकीलकडून पैसा पेरण्यात आल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. यानुसार आता मुंबईबरोबरच देशभरात हवाला करणाऱ्यांवर एनआयए तसेच, तपास संस्था करडी नजर ठेवून आहेत.
दाऊद टोळीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हत्येचा कट आखल्याची माहिती मिळाल्यावर एनआयएने फेब्रुवारीत दाऊद तसेच, त्याच्या साथीदारांविरुद्ध बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर दाऊदची बहीण हसिना पारकरच्या घरावर एनआयएने छापा टाकला होता. या अगोदर मोठ्या प्रमाणात झालेल्या हवाला व्यवहाराची माहिती या छाप्या दरम्यान मिळाल्यावर ईडीने या प्रकरणी तपास सुरू केला होता. एनआयएने या कारवाईचा दुसरा टप्पा मागील आठवड्यात सुरू केला होता.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.