Chhagan Bhujbal On ED Saam Tv
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal On ED: भाजप ईडी, सीबीआयचा वापर करतंय; भुजबळांचा आरोप

लढाई आपण जनतेच्या कोर्टात करुया पण तुम्ही शिखंडी सारखे ईडी मागून खेळू नका, असं भुजबळ म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर काल ईडीने टाच आणली आहे. ईडीनं राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील दादर येथील संपत्ती जप्त केली. ईडीकडून (ED) राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाया सुरू आहेत. यावर आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रीया दिली. भाजप सध्या रडीचा डाव खेळत आहे. भाजप ईडी आणि सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोपही मंत्री भुजबळ यांनी केला.

राजकारणात रडीचा डाव खेळायचा हे भाजपने (BJP) ठरवले आहे. लढाई आपण जनतेच्या कोर्टात करुया पण तुम्ही शिखंडी सारखे ईडी (ED) मागून खेळू नका. तुम्हाला सत्तेत यायचे असेलतर जनतेत जा. आम्ही केलेल्या चुका जनतेला दाखवा. जनता ठरवेल काय करयचं. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपवर केला.

सरकार येत जात पण आम्ही काम करत राहिलो. तुम्हा सरकारच्या त्रुटी दाखवा पण वैयक्तीक आरोप का करता. शंजय राऊत यांनी कितीतरी आरोप केले आहेत. पण त्यांच कोण ऐकत नाही. आमचे दोन मंत्री सध्या तुरुंगात आहेत. जो भाजप (BJP) विरोधात बोलतो त्याला टार्गेट केलं जात. जे शांत बसतात त्यांना काही करत नाहीत, असही भुजबळ म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात केलेल्या टीकेवर बोलताना भुजबळ म्हणाले, त्यांना ईडीने बोलवले तेव्हापासून ते शांत झाले आहेत. तेव्हा पेपरमध्ये येत होत कोहिनूर टॉवर काय आहे. त्यानंतर दिक्षा मिळाली आहे. त्यामुळे ते आता विरोधात बोलत नाहीत.

काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, शेट्टींनी अस करायला नको होते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदारकीसाठी त्यांच नाव राज्यपाल यांना दिलं आहे. पण राज्यपाल यांनी ही यादी थांबवली आहे, यात आमचा काय गुन्हा आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT