chembur  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : मुलगा छेड काढून फरार, मुलीच्या कुटुंबीयांकडून मुलाच्या बापाला मारहाण, चेंबूरमध्ये खळबळ

Mumbai Crime update : चेंबूरमध्ये मुलाने तरुणींची छेड काढली. त्यानंतर मुलगा फरार झाला. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या बापाला मारहाण केली.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई : चेंबूरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या मुलाच्या वडिलांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत मुलाचे वडील गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. चेंबूरच्या गणेश नगरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या चेंबूरमधील आशिष नावाच्या मुलाने दोन मुलींची छेड काढल्याची घटना घडली. चेंबूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गणेश नगरमध्ये ही घटना घडली. यानंतर मुलीच्या कुटुंबाने छेड काढणाऱ्या मुलाच्या कुटुंबाला मारहाण केली. यात मुलाचे वडील राजेश गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र छेड काढणारा तरुण आशिष फरार झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

चेंबूरमधील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन तरुणींना १६ तारखेला सायंकाळी कॉलेज सुटल्यावर आशिष नावाच्या तरुणाने छेडले होते. याबाबत या तरुणीने आपल्या कुटुंबाला ही माहिती दिली. त्यानंतर तरुणींच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार नोंदवली होती.

नेमकं काय घडलं?

पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात ठेवून शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास आशिष याच्या दोन भावांनी तरुणींच्या कुटुंबासोबत वाद घातला. यावेळी दोन गटात हाणामारी झाली झाली. यात आशिष याच्या वडिलांना गंभीर दुखापत झाली. त्याचबरोबर मुलीचे भाऊ प्रेम साळुंखे, अक्षय पवार यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे.

सध्या या सर्वांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र छेडछाड करणारा तरुण आशिष हा फरार झाला आहे. मात्र, पोलिसांनी 16 तारखेलाच कारवाई केली असती तर एवढा मोठा हा प्रसंग घडलाच नसता, असा आरोपच आता मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळा येथील लक्ष्मी नारायण मंदिराच जिर्णोद्धार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव; १३ जणांचा मृत्यू, स्थानिकांची मदतीसाठी धावाधाव

100 रिक्षांना हात दाखवला तरी एकही थांबली नाही; लेकाला कडेवर घेऊन बाप दीड तास उभा, मनसेचे माजी आमदार संतापले

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

Shiv Thakare: कॉलेजमधलं प्रेम, ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण..., ब्रेकअप का झाला? शिव ठाकरेचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT