pune crime news, chaturshringi police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पंतप्रधान कार्यालयात उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी, तळेगाव दाभाडेतील एकावर पुणे पाेलिसांची कारवाई

पाेलिसांच्या चौकशीत संशयिताची भांबेरी उडाली.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune Crime News : पंतप्रधान कार्यालयात (pmo office) उच्चस्पद अधिकारी असल्याची बतावणी करणा-या एका तोतया अधिकाऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात संबंधित संशयितास पाेलिसांना ताब्यात घेतले. (Maharashtra News)

पुणे येथील औंध भागात पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मु काश्मीर येथे मदतीसाठी पाठविण्याकरीता रुग्णवाहिकेचा लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमाच्या वेळी वासुदेव तायडे याने त्याचे नाव डाॅ. विनय देव असे सांगितले. ते स्वत: आयएएस पदावर असून सध्या त्यांची ड्युटी सेक्राेटरी या पदावर पंतप्रधान कार्यालयात असून ते गाेपनीय काम करीत असतात असे सांगितले.

पोलिसांना त्याबाबत संशय आला. त्यानंतर पाेलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यास समर्पक उत्तर देता आले नाही. चाैकशीअंती पाेलिसांनी वासुदेव निवृत्ती तायडे (राहणार तळेगाव दाभाडे) या ताब्यात घेतले. चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे येथे तायडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT