Ajit Pawar News Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: 'मी पुणे मेट्रोमध्ये नोकरीसाठी अप्लाय केलं, पण इथे बिहारीच भरलेय; मेट्रो प्रवासात तरुणीची अजित पवारांकडे तक्रार

Ajit Pawar News: अजित पवारांनी मेट्रोमधील प्रवाशांसोबत संवाद साधला. त्यावेळी एका तरुणीने पुणे मेट्रोमधील नोकर भरतीवरून अजित पवारांनाच तक्रार केली.

Vishal Gangurde

Ajit Pawar News: पुण्यातील वाहतुकीची कोंडी फोडणाऱ्या चांदणी चौकाचं काम पूर्ण झालं आहे. आज या चौकातील नव्या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यंमंत्री अजित पवारांनी मेट्रो ट्रेनने प्रवास केला. त्यावेळी अजित पवारांनी मेट्रोमधील प्रवाशांसोबत संवाद साधला. त्यावेळी एका तरुणीने पुणे मेट्रोमधील नोकर भरतीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच तक्रार केली. (Latest Marathi News)

चांदणी चौकातील नव्या पुलाचा लोकार्पण सोहळ्याला जाताना अजित पवारांनी पुणे मेट्रोने प्रवास केला. त्यावेळी अजित पवारांनी प्रवासी तरुणीशी संवाद साधला. अजित पवार यांनी या तरुणीची विचारपूस करत नव्या पुणे मेट्रो प्रवासाबद्दल विचारलं.

यावेळी अजित पवारांनी मेट्रोच्या तिकीटाविषयी विचारपूस केली. त्यावेळी तरुणीने बसने २० रुपये घेतात, त्याच प्रवासासाठी मेट्रोमध्ये १५ रुपये तिकीट आकारले जात असल्याचंही सांगितलं. तसेच तरुणीने पुढे अजित पवारांना तक्रार करत म्हटलं की, मी पुणे मेट्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज दाखल केला होता. पण मला नोकरी मिळाली नाही. इथे सर्व बिहारीच भरलेय'.

अजित पवारांना अशी तक्रार केल्यानंतर त्यांनी पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न केला. त्यावेळी त्यांनी पुणे मेट्रोची नोकरभरती 'आउटसोर्सिंग' केल्याचं सांगितलं. अजित पवार आणि या तरुणीचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Pune City Latest News)

आंदोलकांची कंपनीला १५ दिवसांची मुदत

नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या तसेच परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पाणी , रस्ते यासारख्या सुविधा द्या या मागण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाने रायगडच्या पेण येथील जे एस डबल्यू कंपनीवर धडक दिली. शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते काही काळ आपसात भिडले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झाले. त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चदरम्यान स्थानिकांच्या नोकर भरतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यासाठी कंपनीला १५ दिवसांची मुदत देण्यात आल्याचे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Maharashtra Live News Update : धाराशिवमध्ये प्रवाशांच्या बसचा भीषण अपघात; जीवितहानी नाही

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT