CHAKAN PIMPRI INDUSTRIAL AREA ACCIDENT CRISIS 580 DEATHS IN 20 MONTHS saam tv
मुंबई/पुणे

चाकण-पिंपरी औद्योगिक पट्ट्यात मृत्यूचा सापळा; खड्ड्यांनी घेतला २० महिन्यांत ५८० जणांचा बळी

580 Deaths In Chakan Pimpri Accident Report: चाकण आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यात अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अवघ्या २० महिन्यांत ५८० जणांचा मृत्यू. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप.

Omkar Sonawane

रोहिदास घाडगे, साम टीव्ही

पुणे: चाकण आणि पिंपरी-चिंचवड या प्रमुख ओद्योगिक क्षेत्रांतील अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे अपघातांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारी 2025 ते जुलै 2026 या अवघ्या 20 महिन्यांच्या कालावधीत अपघातांमध्ये 580 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे अध्यक्ष दिलीप बटवाल यांनी दिली आहे.

25 ते 30 वर्षांपासून समस्या 'जैसे थे'

औद्योगिक क्षेत्राचा ज्या वेगाने विस्तार झाला, त्या प्रमाणात रस्ते, उड्डाणपूल आणि वाहतूक व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांचा विकास झाला नाही. रस्त्यांवरील खड्डे, अरुंद रस्ते आणि दररोज होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे येथे दररोज होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे येथे काम करणाऱ्या लाखो कामगारांच्या तसेच स्थानिक नागरिकांच्या जिवाला रोजच धोका निर्माण होत आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारी दरबारी शेकडो अर्ज सादर केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या, मात्र तरीही ठोस विकासकाम झाले नसल्याची खंत दिलीप बटवाल यांनी व्यक्त केली.

प्रशासकीय दुर्लक्षामुळे अपघातांचे प्रमाण वाढले

औद्योगिक पट्ट्यात दररोज हजारो अवजड वाहने आणि कामगारांच्या दुचाकींची ये-जा असते. मात्र, योग्य नियोजन नसल्याने आणि रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने अपघातांची मालिका सुरुच आहे. केवळ निवेदने देऊनही राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने उद्योजक आणि कामगारांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

चाकण आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, खड्डेमुक्ती आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने विशेष निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अन्यथा येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल, असा इशाराही उद्योजकांकडून दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सांगली हादरली! शेळ्या चरायला गेलेल्या माजी पोलीस पाटलावर तरसाचा भयानक हल्ला, जागीच मृत्यू

Shocking : अंकित बालियान हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांनी २ आरोपींचा केला एनकाऊंटर

Maharashtra News Live Update : भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Swine flu cough: H1N1 झाल्यानंतर खोकला किती दिवस राहतो?

जमीन मालकांसाठी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, जाणून घ्या 'हा' महत्त्वाचा नियम

SCROLL FOR NEXT