Ambernath News Saam Tv News
मुंबई/पुणे

Ambernath Crime : 'चड्डी गँग'चा धुमाकूळ; बारमधील ७०,००० रुपयांवर मारला डल्ला, सीसीटीव्ही आला समोर

Chaddi Gang bar robbery Ambarnath: अंबरनाथमध्ये चड्डी गँगची दहशत, बारमधून लंपास केले ७० हजार रूपये. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा तपास सुरू. अंबरनाथमध्ये भीतीचं वातावरण.

Bhagyashree Kamble

अंबरनाथमध्ये चड्डी गँगची दहशत पाहायला मिळत आहे. चड्डी गँगने एका बारमध्ये चोरी केली आहे. पत्रे तोडून बारमध्ये प्रवेश करत चोरट्यांनी काऊंटरमधून ७० हजार रूपये चोरून नेले आहेत. चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चड्डी गँगच्या शोधात आहेत.

अंबरनाथ पश्चिमेच्या लादीनाका परिसरात राजस पिसाळ यांचा साई सागर बार आहे. ६ फेब्रुवारीला पहाटे अंगात फक्त चड्डी घालून २ चोरट्यांनी बारमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. पत्रे तोडून चोरटे बारमध्ये घुसले. चोरट्यांनी बारमध्ये प्रवेश करताच त्यांनी काऊंटरवर डल्ला मारला.

चोरट्यांनी काऊंटरमधून ७० हजार रूपये चोरले. नंतर पसार झाले. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरी झाल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस सध्या या चड्डी गँगचा शोध घेत आहेत. चड्डी गँगमध्ये नेमके किती जण होते? याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

उल्हासनगरात एमडी ड्रग्जची तस्करी

उल्हासनगरात एमडी ड्रग्जची तस्करी करणार्‍यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दोन आरोपींना ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलने अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शाफिकुर रेहमान आणि आरिफ खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याची माहिती ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी दिली आहे. या कारवाईमुळे उल्हासनगरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

Work From Home Jobs For Women: महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स, घरबसल्या झटक्यात कमवा लाखो रूपये

SCROLL FOR NEXT