रश्मी पुराणिक -
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन केंद्राने राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली असून कोरोनाच्या (Corona) नवीन व्हेरियंटवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकाने दिल्या आहेत.
काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कालच टास्क फोर्स सदस्यांसमवेत एका बैठक आयोजित केली होती. तसंच या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कोरोना नियम पाळण्याचं आवाहन देखील केलं आहे.
हे देखील पाहा -
तसंच जर कडक निर्बंध नको असतील, तर योग्य ती खबरदारी घ्या, मास्क सक्ती केली नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क (Mask) वापरा, ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोविड चाचणी करा, बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवण्याच्या सूचना देखील काल मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. अशातच आता, केंद्र सरकारने देखील राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली असून राज्य सरकारला सूचना करणारं एक पत्र केंद्राने पाठवलं आहे.
राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असून या जिल्ह्यातील टेस्टिंग, लसीकरण (Vaccination) वाढवण्यावर अधिक भर द्या, अशा सूचना करणारं पत्र केंद्राचे आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पाठवलं आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.