Central Railway Power Block News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : मध्य रेल्वेवर विशेष पॉवर ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल, कधी कुठे आणि कसा?

Mumbai Power Block : कांजुर मार्ग पाइपलाइन गर्डर उतरवण्यासाठी मध्य रेल्वेवर कांजुर मार्ग आणि भांडुप विभागात विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. जाणून घ्या पॉवर ब्लॉकची सविस्तर माहिती...

Yash Shirke

मध्य रेल्वेवर दिनांक १४/१५.०५.२०२५ (बुधवार/गुरुवार) आणि दिनांक १५/१६.०५.२०२५ (गुरुवार/शुक्रवार) रात्री कांजुर मार्ग पाइपलाइन गर्डर उतरवण्यासाठी कांजुर मार्ग-भांडुप विभागात विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. 25/138-140 किमीवरील कांजुर मार्ग पाईपलाईन पुलाचे गर्डर350T रोड क्रेनद्वारे उतरवण्यासाठी कांजुर मार्ग आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर; अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि पाचव्या मार्गावर विशेष वाहतूक पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे.

ब्लॉकचे तपशील खालीलप्रमाणे:

ब्लॉक १- दिनांक: १४/१५.०५.२०२५ (बुधवार / गुरुवार रात्री)

ब्लॉक कालावधी: ०१:१५ वाजता ते ०३:१५ वाजेपर्यंत (०२.०० तास)

ट्रॅफिक ब्लॉक विभाग: अप आणि डाऊन धीम्या मार्गावर; अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि पाचवी मार्गिका कांजुर मार्ग मुलुंड दरम्यान

ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गिका; अप आणि डाऊन जलद मार्गिका आणि पाचव्या मार्गिकेवरील कांजुर मार्ग आणि ठाणे स्थानकांदरम्यान सेवा रद्द केल्या जातील.

उपनगरीय गाड्या रद्द:

१. टी १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२४ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०१.१९ वाजता पोहचणारी सेवा रद्द राहणार.

२. टी २ ठाणे येथून ०४.०४ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०५.०० वाजता पोहचणारी सेवा रद्द राहणार.

ब्लॉक २ - दिनांक: १५/१६.०५.२०२५ (गुरुवार/शुक्रवार रात्री)

ब्लॉक कालावधी: ०१:१५ वाजता ते ०३:१५ वाजेपर्यंत (०२.०० तास)

ट्रॅफिक ब्लॉक विभाग:- अप आणि डाउन स्लो लाईन्स; अप आणि डाउन फास्ट लाईन्स आणि ५व्या आणि ६व्या लाईन्स

ब्लॉक काळात कांजूर मार्ग आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन स्लो मार्गावरील सेवा; अप आणि डाउन फास्ट मार्गावरील सेवा आणि पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील सेवा रद्द केल्या जातील.

उपनगरीय गाड्या रद्द:

१. टी १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२४ वाजता सुटेल आणि ठाणे ०१.१९ वाजता पोहचणारी सेवा रद्द राहणार.

२. टी २ ठाणे येथून ०४.०४ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येथे आगमन ०५.०० वाजता पोहचणारी सेवा रद्द राहणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: झालं ते चुकीचं झालं, मारहाणीचा कडक शब्दात निषेध - तटकरे

Today Gold Rate: सोन्याचे भाव पुन्हा १ लाखांच्या पार; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर

वडिलांच्या संपत्तीसाठी मुलगा हैवान, जन्मदात्या आईला वृद्धश्रमात अन् बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये धाडलं | Pune

Nashik : सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; तिघांविरोधात गुन्हा दाखल, नातेवाईकांनी सासरच्या अंगणात केला अंत्यविधी

Maharashtra Politics : ४ मंत्री, शिवसेनेचे ४ खासदार हनी ट्रॅपमध्ये, गिरीश महाजनांचा फोटो टाकत संजय राऊतांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT