Crime News : भाजप नेत्याच्या सावत्र मुलाचा संशयास्पद मृत्यू, घरातील बेडवर आढळला मृतदेह

BJP Leader's Stepson Death : कोलकातामधील भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप घोष यांच्या सावत्र मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राहत्या घरात बेडवर मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे.
Crime News
Crime News X
Published On

भारतीय जनता पार्टीचे पश्चिम बंगालमधील नेते दिलीप घोष यांची पत्नी रिंकू मजुमदार यांचा मुलगा श्रींजय दासगुप्ता याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (१३ मे) सकाळी ७ वाजता श्रींजय न्यूटाऊन येथील त्याच्या राहत्या घरी आढळला. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर श्रींजयला विधाननगर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

रुग्णालयात पाठवल्यानंतर तेथील डॉक्टरांनी श्रींजयला मृत घोषित केले. श्रींजयचा मृत्यू कसा आणि का झाला याचा तपास पोलीस करत आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदानासाठी आरजी कार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. राहत्या घरातील बेडवर श्रींजय मृत अवस्थेत आढळला. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Crime News
Pune News : राहत्या घरात दांपत्याची आत्महत्या, गळफास घेऊन जीवन संपवलं; कारण...

श्रींजय दासगुप्ता हा भाजप नेते दिलीप घोष यांचा सावत्र मुलगा आहे. दिलीप घोष यांची पत्नी रिंकू मजुमदार यांच्या पहिल्या पतीचा श्रींजय मुलगा आहे. न्यू टाउन परिसरातील फ्लॉटमध्ये त्याचा मृतदेह संशयास्पद परिस्थिती आढळला. मृत्यूचे कारण समोर आले नाही. शवविच्छेदनानंतर मृत्यूमागील कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. रिंकू मजुमदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार केलेली नाही.

Crime News
येऊर हिल्समध्ये ५०० रुपये देऊन बलात्काराचा परवाना मिळतो, जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा

श्रींजयचा मृतदेह फ्लॉटमधील बेडवर आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. अहवाल आल्यानंतरच या प्रकरणात स्पष्टपणे काहीही सांगता येईल अशी पोलिसांची भूमिका आहे. दुसरीकडे, सोमवारी फ्लॉटमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते असे स्थानिक नागरिकांना म्हटले आहे. ही घटना पक्षाशी संंबंधित असू शकते असा संशय आहे.

Crime News
Kalyan News : खासगी शाळेतील संचालकाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; पालकांचा संताप, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com