csmt railway station  Saam tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! एकाच ट्रॅकवर अचानक २ लोकल, मोटरमनमुळे मोठी दुर्घटना टळली, ऐन गर्दीच्या वेळी नेमकं घडलं काय?

csmt railway station : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झालीये. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे.

Vishal Gangurde

मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभरातून दुसऱ्यांदा विस्कळीत

मस्जीद बंदर रेल्वे स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड

वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल

मध्य रेल्वेची वाहतूक आज मंगळवारी दुसऱ्यांदा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर गाड्या आज सकाळपासून उशिराने धावत आहेत. दिवा, ठाणे स्टेशनवर सकाळी प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर आता संध्याकाळी देखील मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. मशीद बंदर स्टेशन जवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गाड्या स्टेशनवर थांबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

मध्य रेल्वेवरील गाड्या सकाळपासून उशिराने धावत असताना आता तांत्रिक बिघाडाची भर पडली आहे. कल्याण-सीएसएमटीदरम्यान धावणारी जलद लोकल मस्जिद बंदर स्टेशनच्या अलीकडे थांबवण्यात आल्या. गाड्या थांबवण्यात आल्याने प्रवासी ट्रॅकवरून चालत स्टेशनला जात आहेत.

नेमकं काय घडलं?

सीएसएमटी स्टेशनवर बदलापूरहून येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर घेण्यात आली. कारण प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आधीच दुसरी लोकल उभी होती. सध्या लोकल गाड्या मागे घेण्यात आल्या असून वाहतूक पुन्हा सुरू होत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ते 8 बंद ठेवण्यात आले होते. स्टेशनवर दुपारी 3.18 पासून हालचाल थांबवण्यात आली होती. आता गाड्या मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून वाहतूक सुरू होत आहे.

लोकल गाड्या उशिराने का धावताहेत?

मध्य रेल्वेवर रात्री खर्डी स्टेशनजवळ एक आवश्यक ब्लॉक घेण्यात आला होता. मध्य रेल्वेने घेतलेला ब्लॉक ३ वाजता संपून रेल्वे सुरू होणार होत्या. मात्र त्यांनी ब्लॉक ६ वाजेपर्यंत सुरू ठेवला. रेल्वेचा ब्लॉक सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहिल्यामुळे लोकल आणि एक्स्प्रेस बंद राहिल्याने परिणामी आज देखील मध्य रेल्वेची वाहतूक प्रचंड उशिराने धावत आहे. कामावर जाणाऱ्या नागरिकांना आज देखील लेटमार्क लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT