Central Railway Local Train Update Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कसारा-आसनगाव लोकलसेवा ठप्प

Central Railway Local Train Update : ओव्हरहेड वायर तुटल्याने आसनगाव ते कसारा या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. त्यामुळे लोकसेवा बंद करण्यात आल्या आहेत.

Satish Daud

मुंबईसह उपनगरात शनिवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसला आहे. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना तसेच रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. त्यातच ओव्हरहेड वायर तुटल्याने आसनगाव ते कसारा या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. त्यामुळे लोकसेवा बंद करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे भल्यापहाटे कामावर निघालेल्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. शनिवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबईसह संपूर्ण परिसराला पावसाचा अक्षरश: झोडपून काढलं आहे.

पावसामुळे सगळीकडे पाणीच-पाणी साचले असून नागरिकांना रस्त्यांमधून वाट काढावी लागत आहेत. काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने लोकल सेवेलाही मोठा फटका बसला आहे. त्यातच झाडपडीच्या घटना घडल्याने रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या कसारा ते आसनगाव मार्गावरील ओव्हर हेड वायर तुटली आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकलसेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. परिणामी प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून सध्या बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांनी संयम बाळगावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1 कोटीत मिळणार नगरसेवकपद? कुठे लागली नगरसेवकपदाची बोली?

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

पुण्यातील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; विदेशी महिलांचा बाजार, पोलिसांनी 'असा' उघडा पाडला डाव

Gold Rate Today: आठवड्याभराच्या घसरणीनंतर पुन्हा सोनं महागलं; १० तोळ्यामागे १८,६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Amla Juice For Long Black Hair: काळे आणि लांब केस हवे आहेत? रोज प्या आवळ्याचा रस

SCROLL FOR NEXT