Central Railway  saam tv
मुंबई/पुणे

रेल्वेतील फुकटे प्रवासी वाढले; मध्य रेल्वेने केला कोटींचा दंड वसूल

मध्य रेल्वेने (Central Railway) पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून २०२२ मध्ये फुकट्या प्रवाशांकडून १०३.३९ कोटी रुपयांचा दंड वसुल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुमित सावंत

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून २०२२ मध्ये फुकट्या प्रवाशांकडून १०३.३९ कोटी रुपयांचा दंड वसुल केला आहे. फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून सदर कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे मध्य रेल्वेत (Railway) फुकट्या प्रवाशांचे प्रमाण लक्षणीय असल्याची बाब समोर आली आहे. विनातिकीट प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे फुकट्या प्रवाशांकडून जमा होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ( Central Railway News In Marathi )

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने फुकट्या प्रवाशांकडून एप्रिल-जून २०२२ या पहिल्या तिमाहीत रु.१०३.३९ कोटी रुपयांचा विक्रमी तिकीट (Ticket) तपासणी महसूल जमा केला आहे. जून-२०२२ या महिन्यात, मध्य रेल्वेने बुक न केलेल्या सामानासह विनातिकीट/अनियमित प्रवासाच्या ४.८३ लाख प्रकरणांद्वारे ३१.७८ कोटींचा महसूल नोंदवला आहे. एप्रिल-जून २०२२ या पहिल्या तिमाहीत, विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण १४.९४ लाख प्रकरणे आढळून आली आहेत, तर मागील वर्षी याच कालावधीत ५.०४ लाख प्रकरणे आढळून आली असून त्यात १९६.३२% ची वाढ दिसून आली आहे.

विनातिकीट/अनियमित प्रवासातून प्राप्त झालेल्या महसुलात पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून २०२२ साठी रु.१०३.३९ कोटी नोंदवले गेले आहेत, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत नोंदवलेल्या रु.३१.५८ कोटी महसुलाच्या तुलनेत २२७.४०% ची वाढ दर्शवतात. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस, हजर होण्याचे आदेश, नेमकं कारण काय? VIDEO

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

Maharashtra Live News Update: निवडणुकीत कोणासोबत युती किंवा आघाडी करायची यासंदर्भात काँग्रेस बुधवारी निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT