Kasara railway line midnight block timing and schedule today saam tv
मुंबई/पुणे

Central Railway : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्यरात्री विशेष ब्लॉक; लोकलच्या वेळापत्रकात बदल, एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम

Central Railway block : तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

Saam Tv

कसारा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या मार्गिकेचे काम आणि कसारा यार्डमधील विस्तारीकरणाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून आज (शनिवारी) आणि उद्या (रविवारी) मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रात्री ११.१० ते मध्यरात्री १.४० या वेळेत खर्डी ते कसारा दरम्यान अप मुख्य मार्गिका आणि तिसऱ्या मार्गिकेवर हा ब्लॉक असेल. त्यामुळे या कालावधीत खर्डी-कसारा दरम्यान लोकल सेवा बंद राहणार असून काही लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच आठ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना २० ते २५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या कसारा येथे सुरू असलेल्या तिसऱ्या मार्गिकेच्या प्रकल्पांतर्गत नॉन-इंटरलॉकिंगची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. याशिवाय कसारा यार्डमधील गुनातपारच्या दिशेने असलेल्या अप यार्ड मार्गिकेचा विस्तारही करण्यात येणार आहे.

कल्याण-कसारा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिका प्रकल्पातील आसनगाव-कसारा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या मार्गिका पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुल्या झाल्यानंतर उपनगरीय आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होऊन भविष्यात लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यास मदत होणार आहे.

लोकलच्या वेळापत्रकात बदल

ब्लॉकदरम्यान खर्डी आणि कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १.३२ वाजता सुटणारी कसारा लोकल आसनगाव स्थानकापर्यंतच धावणार आहे. तर कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल रात्री १०.४७ वाजता सुटेल. त्यानंतर पहिली लोकल रात्री ११.०५ वाजता सुटणार आहे.

प्रवाशांनी ब्लॉकचे वेळापत्रक लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP News: मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीनंतर भाजपमध्ये मंत्र्यांची झाडाझडती, कामाचा अहवाल मागवला

बोटे मोडण्याची सवय चांगली की वाईट?

Gold Price Drop : आठवड्यात सोनं ₹१२,५४० स्वस्त; आताच दागिने घ्यायचे की थांबायचं? तज्ञांचा सल्ला

Broom Cleaning Hack: झाडूच्या खालच्या भागाला अ‍ॅल्युमिनियम फॉइल का गुंडाळतात? साफ-सफाईसाठी तुम्हीही वापरा ही सोपी ट्रिक!

Maharashtra News Live Update: पाटण तालुक्यातील तारळे धरणावरील आदानी प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT