Railway Mega Block X
मुंबई/पुणे

मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक; कधी, कुठे आणि कसा? रविवारी घराबाहेर पडण्याआधी पाहा वेळापत्रक

Mumbai Mega Block : १८ मे रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य तसेच हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉकमुळे वेळापत्रकात कोणते बदल झालेत? पाहा

Yash Shirke

Mumbai Mega Block : मध्य रेल्वे मुंबई विभागाद्वारे रविवार दिनांक १८ मे २०२५ रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परीचालीत केला जाणार आहे. यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत.

ठाणे - कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०:४० ते दुपारी ०३:४० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९:३४ ते दुपारी ३:०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/सेमी-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील, या सेवा त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०:२८ ते दुपारी ३:४० पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/सेमी-जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, या सेवा त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि नंतर मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस /दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जातील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस /दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवल्या जातील.

वडाळा रोड - मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११:०० ते संध्याकाळी ०४:०० पर्यंत

ब्लॉक काळात वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सकाळी ०९:४० ते दुपारी ३:२८ पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पनवेल/बेलापूर/वाशीच्या दिशेने सकाळी १०:१४ ते दुपारी ३:५४ पर्यंत डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ब्लॉक काळात पनवेल-मानखुर्द-पनवेल मार्गावर विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील.

हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी १०:०० ते संध्याकाळी ४:३० पर्यंत ट्रान्स हार्बर लाईन/मुख्य मार्गिकेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT