Digha Railway Station Saam TV
मुंबई/पुणे

Digha Railway Station: दिघा रेल्वे स्टेशन लवकरच सुरु होणार, बांधकाम पूर्ण; उद्घाटनाची तारीख ठरली?

विटावा, दिघा वासियांसाठी हे स्टेशन खूप फायदेशीर ठरणार आहे.

प्रविण वाकचौरे

ठाणे : रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-पनवेलदरम्यान दिघा रेल्वे स्टेशन लवकरच सुरु होणार आहे. या रेल्वे स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. विटावा, दिघा वासियांसाठी हे स्टेशन खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे दिघा रेल्वे स्टेशन कधी सुरु होणार याच्या प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत.

फेब्रुवारी महिन्यातच दिघा हे नवीन रेल्वे स्टेशन सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) ने ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील या स्थानकाचे काम 200 कोटी रुपये खर्चून पूर्ण केले आहे. हे स्टेशन 476 कोटी रुपयांच्या ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा एक भाग आहे, जे कल्याण ते नवी मुंबई प्रवास सुलभ करेल. (Latest Marathi News)

ठाणे आणि ऐरोली या स्टेशन्सदरम्यान दिघा स्टेशन आहे. हे स्टेशन सुरु झाल्यास विटावा, दिघा परिसरातील लोकांचा याचा सर्वाधिक फायदा होईल. येथील नागरिकांना सध्या रेल्वेप्रवासासाठी ऐरोली आणि ठाणे स्टेशनला जावं लागतं, त्याचा तो त्रास कमी होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी अनेक रेल्वे प्रकल्पांचा त्यांच्या हस्ते शुभारंभ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी दिघा स्टेशनचं देखील उद्घाटन होण्याची शक्यता आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT