Mega Block news saam tv
मुंबई/पुणे

Mega Block : चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी; मध्य रेल्वेवर शुक्रवारी विशेष मेगा ब्लॉक, कुठे आणि कधी? वाचा

शुक्रवारी कर्जत यार्ड सुधारणेसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Central Railway Mega Block : मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या चाकारमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. शुक्रवारी कर्जत यार्ड सुधारणेसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी १०.४५ ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत घाट विभागातील तिन्ही मार्गांवर कर्जतपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलवर परिणाम होणार आहे. (Latest Marathi News)

मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंबई विभागातील कर्जत यार्ड बदलासंदर्भात कर्जत स्थानकावर ४ क्रमांकाचे पोर्टल उभारण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी १०.४५ ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत घाट विभागातील तिन्ही मार्गांवर कर्जतपर्यंत ब्लॉक घेण्यात येणर आहे. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.

तपशील खालीलप्रमाणे

कधी : १६/१२/२०२२

केव्हा : सकाळी १०.४५ ते १२.०० वाजेपर्यंत

कुठे : घाट विभागातील तिन्ही मार्गांवर कर्जतपर्यंत ब्लॉक

उपनगरीय गाड्यांची धावण्याची पद्धत

कर्जतहून सकाळी १०.४५ वाजता सुटणारी SKP-5 खोपोली लोकल आणि 11.20 वाजता खोपोलीहून सुटणारी SKP 10 कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 22731 हैदराबाद-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस लोणावळा येथे नियमित केली जाईल आणि निर्धारित वेळेच्या 20-65 मिनिटे उशिरा पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi : राहुल गांधी गो बॅक! भाजप सरकारच्या मंत्र्यांनी अडवला ताफा, घेराव घातला, रस्त्यावरच मांडला ठिय्या

Maharashtra Live News Update : नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना

Tandalachi Kheer: वाटीभर तांदळापासून बनवा गोड खीर, वाचा पारंपरिक रेसिपी

Deepika Padukone : लेकीच्या वाढदिवसाला दीपिकाने बनवला केक, रणवीर सिंगने केलं कौतुक

Leopard Attack : डोळ्यादेखत चिमुकल्याला बिबट्याने नेले फरफटत; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

SCROLL FOR NEXT