Mega block Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

Mumbai Mega Block local : मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या मेगाब्लॉकची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Saam Tv

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेवरील मांटुगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनमधून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा रेल्वे स्टेशनवर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील. तसेच या लोकल १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड रेल्वे स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.

ठाणे रेल्वे स्टेशनमधून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या सेवा मुलुंड रेल्वे स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तसेच मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

हार्बरच्या पनवेल -वाशी अप आणि डाऊन मार्गावर ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. पनवेलमधून सकाळी १०.३३ ते संध्याकाळी ४.४९ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५.१२ पर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाणे येथे जाणारी अप ट्रान्स-हार्बर लाईन सेवा रद्द होतील. तसेच ठाण्यातून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेलकडे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर लाईन सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाशी विभागात विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगाव शासकीय रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला, बेदम मारहाणीत डॉक्टर रक्तबबाळं

SBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; पगार १,०५,२८० रुपये; अर्ज कसा करावा?

मोदी विश्वगुरू नव्हे तर चपराशी, आंबेडकरांची जहरी टीका, नेमकं काय म्हणाले ?

Harbour Line : हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये मोटरमन अस्वस्थ, मोठी दुर्घटना टळली | VIDEO

Shravan Nakshatra Horoscope: आजचा दिवस ठरणार शुभ! शनिवारी श्रवण नक्षत्रात ‘या’ चार राशींवर राहणार ग्रहांची विशेष कृपा

SCROLL FOR NEXT