Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला-भांडूप दरम्यान ३ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; अनेक लोकल रद्द, पाहा सविस्तर वेळापत्रक

Mumbai Local Kurla and Bhandup Train Block : मध्य रेल्वेकडून कुर्ला-भांडूप दरम्यान ३ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. अनेक लोकल गाड्या रद्द, वळवण्यात किंवा शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत.

Namdeo Kumbhar

Kurla Bhandup night block Mumbai local cancelled train list : मध्य रेल्वेच्या कुर्ला-भांडूप या दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार स्थानकावरील मधल्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याकरिता विद्याविहार स्थानकावर (कुर्ला-भांडुप विभाग) विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस ट्रेनवर परिणाम होणार आहे. हा ब्लॉक नेमका कसा असेल? कोणत्या लोकलवर परिणाम होणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

ब्लॉकची तारीख आणि कालावधी

दिनांक १५/१६.०५.२०२६ रोजी ०१.१५ ते ०४.१५ (शुक्रवार/शनिवार रात्री),

दिनांक १६/१७.०५.२०२६ रोजी ००.१० ते ०४.४० (शनिवार/रविवार रात्री) आणि

दिनांक १७/१८.०५.२०२६ रोजी ०१.१५ ते ०३.०५ (रविवार/सोमवार रात्री)

ब्लॉक विभाग: कुर्ला (स्टेशन वगळून) ते भांडुप (क्रॉसओव्हर वगळून) या दिवशी:

दिनांक १६.०५.२०२६ रोजी अप आणि डाउन धिम्या मार्गावर (शुक्रवार/शनिवार रात्री)

दिनांक १६/१७.०५.२०२६ रोजी अप आणि डाउन धीमा मार्ग, जलद मार्ग, ५व्या आणि ६व्या मार्गावर (शनिवार/रविवार रात्री)

दिनांक १५/१६.०५.२०२६ (शुक्रवार/शनिवार रात्री) रोजी धावणाऱ्या उपनगरी गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.

दिनांक १६/१७.०५.२०२६ रोजी (शनिवार/रविवार रात्री) उपनगरीय गाड्यांचे कामकाज

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २३.३० ते ००.१२ पर्यंत सुटणाऱ्या कर्जत येथे जाणाऱ्या डाउन धीमी सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत.

कसारा येथून रात्री २२.०० वाजता सुटणारी आणि बदलापूर येथून २३.२९ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी अप धीमी सेवा, तसेच कर्जत येथून पहाटे ०२.३० वाजता सुटणारी आणि अंबरनाथ येथून ०३.४३ वाजता सुटणारी सेवा, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या नाहूर, कांजूरमार्ग व विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत.

खालील गाड्या रद्द राहतील

ठाणे-कुर्ला उपनगरी ट्रेन, ठाणे येथून रात्री २३.४० वाजता सुटणारी

ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन, ठाणे येथून पहाटे ०४.०४ वाजता सुटणारी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ठाणे उपनगरी ट्रेन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २३.३८ वाजता आणि ००.२४ वाजता सुटणारी

खालील गाड्या कमी अंतरावर थांबवल्या जातील

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २३.०० वाजता, २३.४६ वाजता, २३.५५ वाजता आणि २३.१२ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ठाणे लोकल (वातानुकूलित उपनगरी ट्रेन) कुर्ला स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

डोंबिवली- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन, डोंबिवली येथून रात्री २२.१८ वाजता सुटणारी ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. खालील गाड्या शॉर्ट ओरीजनेट करण्यात येईल.

विद्याविहार येथून पहाटे ०४.४५ वाजता सुटणारी कुर्ला- टिटवाळा लोकल ठाणे येथून पहाटे ०५.०९ वाजता सुटेल.

ठाणे येथून पहाटे ०४.१६ वाजता सुटणारी ठाणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कुर्ला येथून पहाटे ०४.४२ वाजता सुटेल.

दिनांक १६/१७.०५.२०२६ (शनिवार/रविवार रात्री) रोजी धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस लोकलवर कोणताही परिणाम होणार नाही.

दिनांक १७/१८.०५.२०२६ (रविवार/सोमवार रात्री) रोजी धावणाऱ्या लोकलवर कोणताही परिणाम होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर अपघात, धावत्या ट्रकला कारने दिली धडक

Mumbai Rain: मुंबईसाठी पुढचे ३ तास महत्वाचे, मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज

Pune - Raigad Fort : पुणे-रायगड सीमेवरील ऐतिहासिक ठिकाण, रायगडाच्या संरक्षणासाठी बांधलेला 'हा' किल्ला पाहिलात का?

Bathroom vs washroom: बाथरूम आणि वॉशरूममध्ये नेमका फरक काय असतो?

‘लव्ह अँड वॉर’ सेटवर कामगाराचा मृत्यू; AICWA चे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; संजय लीला भन्साळींवर कारवाईची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT