छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक राहणार.
१ ऑक्टोबर ते १९ डिसेंबर २०२५ दरम्यान प्लॅटफॉर्म १८ बंद.
यामुळे काही गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार.
Central Railway Power Block News : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ८० दिवस पुनर्विकासाचे काम सुरु राहणार आहे. १ ऑक्टोबर २०२५ ते १९ डिसेंबर २०२५ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचलीत केला जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल भूमी विकास प्राधिकरण (आरएलडीए) मार्फत चालू असलेल्या मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे. या ब्लॉकदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर पायाभूत कामे व सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याची कामे केली जातील. या ब्लॉकचा कालावधी ८० दिवसांचा असून तो १ ऑक्टोबर २०२५ पासून ते १९ डिसेंबर २०२५ पर्यंत असेल.
ब्लॉकच्या कालावधीत, ०१.१०.२०२५ पासून काम पूर्ण होईपर्यंत आणि ट्रॅफिक संचालनासाठी आरएलडीए तर्फे प्लॅटफॉर्म हस्तांतरित होईपर्यंत, प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वरून गाड्यांची वाहतूक बंद राहील. १ ऑक्टोबर चे १९ डिसेंबर अशा ८० दिवसांत प्लॅटफॉर्म क्रमांक १८ बंद राहणार आहे.
खालील अप मेल/एक्सप्रेस गाड्या, ज्यांचा प्रवास ३०.०९.२०२५ रोजी सुरू होईल, या गाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत दादर येथेच शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील:
- ट्रेन क्र. 12112 अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
- ट्रेन क्र. 11002 बल्लारशाह – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
हे ब्लॉक्स पायाभूत सुविधा विकासासाठी अत्यावश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.