राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी Saam TV
मुंबई/पुणे

राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी

बारामती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे आज सकाळ पासून केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: बारामती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे आज सकाळ पासून केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाकडून संबंधीत छापेमारी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. सकाळपासूनच सुरु झालेल्या या कारवाईमूळे मोठी खळबळ उडाली आहे. नगर जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या निकटवर्तीयाची आयकर विभागाच्या पथकाकडून चौकशी केली जात आहे. काटेवाडीत हा निकटवर्तीय राहतो. दुसरीकडे बारामती MIDC मधील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत एक पथक पोहोचले आहे. त्यांच्याकडून कंपनीत तपासणी केली जात आहे.

आयकर विभाग यापैकी एका विभागाकडून ही चौकशी सुरु आहे. भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कालच्या बारामती दौऱ्या नंतर दुसऱ्याच दिवशी ही छापेमारी सुरु झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

या ठिकाणी सुरू आहे ही कारवाई

- अंबालिका शुगर कर्जत

- दौंड शुगर दौंड

- जरंडेश्वर साखर कारखाना सातारा

- पुष्प दंतेश्वर साखर कारखाना नंदुरबार

- जगदीश कदम अंबालिका

- वीरधवल जगदाळे, दौड शुगर

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपमध्ये जुन्यांना येणार पुन्हा अच्छे दिन

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Gold Rate Today: नवरात्र सुरू होताच सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील २४-२२-१८ कॅरेट सोन्याचे ताजे दर

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

SCROLL FOR NEXT