central home minister amit shah to visit lalbaug raja mumbai ganesh festival 2023 Saam TV
मुंबई/पुणे

Amit Shah News: मुंबई दौऱ्याआधी अमित शहांचं मराठीत ट्वीट; म्हणाले, 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी...'

Satish Daud

Amit Shah Lalbaug Raja Darshan

मुंबईत गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असून प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाच्या दर्शनासाठी अनेक भाविक गर्दी करीत आहेत. सेलिब्रिटीसह अनेक राजकीय पुढारी सुद्धा लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आज मुंबई दौऱ्यावर येणार असून लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे. अमित शहांनी मराठीत ट्वीट करत ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

"संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज मी मुंबईच्या जगप्रसिद्ध 'लालबागचा राजा'च्या (Lalbaugcha Raja) दर्शनासाठी खूप उत्सुक आहे. वांद्रे पश्चिम मधल्या प्रसिद्ध गणेश मंडळातील बाप्पाचे मी पूजन करणार आहे", असं ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे.

संध्याकाळी सहकार चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ श्री. लक्ष्मणराव इनामदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित एका विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे, असं देखील अमित शहा (Amit Shah) यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर अमित शहा यांनी गेल्यावर्षी पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं.

यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील इतर सदस्य देखील उपस्थित होते. यंदाही अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. दुपारी २ वाजता मुंबईत दाखल झाल्यानंतर शहा सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतील. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेणार आहे.

यानंतर अमित शहा वांद्रे येथील आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेणार आहेत. पुढे मुंबई विद्यापाठीत एका कार्यक्रमात सहभागी होऊन संध्याकाळी सात वाजता शहा दिल्लीला रवाना होतील. दरम्यान, अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT