Crop Insurance Saam tv
मुंबई/पुणे

Video : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; प्रधानमंत्री पीकविमा भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या अंतिम तारीख

PM Crop Insurance deadline : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.प्रधानमंत्री पीकविमा भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Vishal Gangurde

रुपाली बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांसाठी पीकविमा भरण्याची मुदत वाढवली आहे. 31 जुलैपर्यंत पीकविमा भरण्याची मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदवाढ करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची १५ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे त्यांना संधी मिळावी यासाठी पिकविमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीला यश आलं. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थींची कॉमन सर्विस सेंटर (CSC)च्या केंद्रांवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. या पिकविम्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज आणि लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाल्याचे समोर आले. त्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहत होते. या पार्श्वभूमीवर पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता.

मंत्री मुंडे या मुदतवाढीसाठी स्वत: पाठपुरावा करत होते. त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पिक विमा भरण्याचे मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने विमा भरण्यासाठी मुदत वाढ दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

Maharashtra News Live Update: सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

SCROLL FOR NEXT