Loan Fraud Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Loan Fraud Case : मोठी बातमी! चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला अटक; बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची कारवाई

आयसीआयसीआय बँकच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना देखील अटक करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Loan Fraud Case News : आयसीआयसीआय बँकच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना देखील अटक करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन आणि आयसीआयसीआय बँकचा कर्ज घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे सीबीआयने ही मोठी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. ई़डीने आधी ३००० रुपयांहून अधिक रुपयांचा बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणी तपास सुरू केल्यानंतर चंदा कोचर यांना पद सोडावे लागले होते. तसेच त्यांचे पती दीपक कोचर यांनाही या गुन्हात कट रचण्याप्रकरणी अटक केली आहे.

ईडीने सप्टेंबर २०२० मध्ये दीपक कोचर यांना केली होती अटक

सीबीआय द्वारे मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा नोंद केल्यानंतर ईडीने सप्टेंबर २०२० मध्ये अटक केली होती. ईडीचा आरोप आहे की, आयसीआयसीआय बँकच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉनला ३००० कोटी रुपयांहून अधिक कर्जाला मान्यता दिली. कर्ज मंजरू झाल्यानंतर व्हिडिओकॉनने ८ सप्टेंबर रोजी ६४ कोटी रुपये हे न्यूपॉवर रिन्यूएबल प्रायव्हेट लिमिटेड (एनआरपीएल)ला हस्तांतरित केले. एनआरपीएलचे मालक हे दीपक कोचर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT