Crime News SaamTv
मुंबई/पुणे

Crime News : वाढदिवसाच्या कार्यक्रमात राडा; महिला कार्यकर्त्याचा मोबाईल फोडला, परस्परविरोधी गुन्हा दाखल

दाेन्ही गटाकडून परस्पर विराेधी तक्रारी करण्यात आल्या.

अजय दुधाणे

Crime News : उल्हासनगरात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात मोठा राडा झाला. महापालिकेच्या जलकुंभाखाली सुरू असलेल्या या कार्यक्रमाचं महिला सामाजिक कार्यकर्त्याने चित्रीकरण केल्यानं जमावाने या महिलेचा मोबाईल फोडला. यानंतर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि ऍट्रोसिटी असे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत.

उल्हासनगरच्या कॅप ४ परिसरात शिवसेना शाखाप्रमुख उल्हास फालके यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हा राडा झाला. फालके यांच्या वाढदिवसानिमित्त जलकुंभाच्या खाली जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र जलकुंभ हे प्रतिबंधित क्षेत्र असल्याने त्याखाली वाढदिवस साजरा करता येत नाही, अशी भूमिका घेत सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांनी तिथे जाऊन चित्रीकरण केलं.

मात्र तिथे उपस्थित काही जणांनी त्यांना रोखत वाद घातला आणि मारहाण करत त्यांचा मोबाईल (mobile) फोडला. यानंतर खानचंदानी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मोठा गोंधळ घातला. त्यांच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरीकडे खानचंदानी यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून जबरदस्तीने मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित केल्याचा आरोप फालके यांच्या मित्र परिवाराने केला. याप्रकरणी सरिता खानचंदानी यांच्यावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी (police) या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT