निर्दयी आई! बेदम मारहाणीत चिमुकलीचा मृत्यू; गुन्हा दाखल Saam Tv
मुंबई/पुणे

निर्दयी आई! बेदम मारहाणीत चिमुकलीचा मृत्यू; गुन्हा दाखल

नानसी सोनुकुमार सोनी (वय 02) असे आईच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या लहान मुलीचे नाव आहे.

चेतन इंगळे

विरार पूर्व फुलपाडा परिसरातील पारिजात आपर्टमेंटमध्ये शनिवारी ही घटना घडली आहे. मुलीच्या शवविच्छेदन अहवालावरून हत्याऱ्या आई विरोधात आज विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केले आहे. नानसी सोनुकुमार सोनी (वय 02) असे आईच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या लहान मुलीचे नाव आहे. तर नेहा सोनुकुमार सोनी (वय 22) असे आपल्याच मुलीची हत्या केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

आरोपी महिलेचा पती हा रिक्षाचालक असून, पत्नी गृहिणी आहे. या दाम्पत्याना 2 मुलीच आहेत. नानाशी ही मोठी मुलगी आहे तर 1 वर्षांची लहान दुसरी मुलगी आहे. तर तिसऱ्यादा आरोपी महिला ही गरोदर आहे.

शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास आईने रागाच्या अनावर झाल्याने आपल्या 2 वर्षाच्या नानशी या मुलीला बेदम मारहाण केली. त्यातच ती बेशुद्ध झाली. पत्नीने त्वरीत याची माहिती पतीला दिल्या नंतर मुलीला लगेचच उचलून विरार पश्चिम ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आज मुलीच्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिच्या डोक्यावर, अंगावर अंतर्गत जखमा आढळून आल्याने तिचा मृत्यू मारहाणितून झाल्याचे उघड झाले आहे.

विरार पोलिसांनी शवविच्छेदन अहवालावरून तपास करून आरोपी आई विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केल्याची माहिती माहिती विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे. आरोपी आई नेहमी घरात भांडण करत होती. आपल्या मुलांना ती वारंवार मारहाण करीत असे. मुलांच्या ओरडण्याने जर कोणी शेजारी सोडवायला किंवा समाजावयाला गेले तर त्यांनाही बोलून महिला हाकलून देत असे. आज तिच्या रागातून एका मुलीची हत्या झाली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शेजाऱ्यांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सुंदर मुलांना पाहून यायचा राग, पाण्यात बुडून करायची हत्या; महिलेने चौघांना संपवलं, पोटच्या मुलालाही सोडलं नाही

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

KL Rahul: 358 रन्स करूनही भारताच्या पदरी पराभवच; 'या' खेळाडूंवर केएल राहुलने फोडलं खापर, म्हणाला, मी स्वतःला दोष देतोय कारण...!

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Badlapur Travel : साहसी प्रेमींसाठी पर्वणी बदलापूरमधील 'हे' ठिकाण, येणारा वीकेंड होईल खास

SCROLL FOR NEXT