Police Saam Tv
मुंबई/पुणे

गुन्ह्यांची कागदपत्रे सुपूर्द न केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

सुरज सावंत

मुंबई - गुन्ह्यांची कागदपत्रे सुपूर्द न केल्याप्रकरणी पोलीस (Police) अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२० मध्ये अधिकारी अनिल सोनावने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोनावणे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.

गुन्ह्यात सहभाग आढळल्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्याकडील गुन्ह्यांची कागदपत्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगण्यात आले होते. पण त्यांनी ती जमा केली नाहीत. याच गुन्ह्यांची कागदपत्रे पोलीस ठाण्यात सुपूर्द न केल्यामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक अनिल सोनावणे यांच्या विरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

प्राथमिक तपासात सोनावणे यांच्याकडे तीन अपघात, एक चोरी, एक बाल कामगार प्रतिबंधक असे पाच गुन्हे होते. एक अपमृत्यूचे प्रकरणही सोनावणे यांच्याकडे होते. या प्रकरणाची कागदपत्रे जमा करण्याबाबत सोनावणे यांना वारंवार स्मरणपत्र पाठवण्यात आले होते. पण त्यानंतरही त्यांनी ही कागदपत्रे सुपूर्द केली नाहीत.

तसेच मालवणी गुन्ह्यांच्या प्रकरणात शोध घेतला असता ती सापडली नाहीत. त्यामुळे पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांच्या तक्रारीवरून सोनावणे यांच्या विरोधात बुधवारी भादवि कलम १६६, १७५,२१७, २१८ महाराष्ट्र सार्वजनिक नोंद कायदा २००५ भादवि कलम ९ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम दौरा रद्द

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

SCROLL FOR NEXT