AI News : AI माणसाला संपवणार? AI विरुद्ध मानवाचं युद्ध अटळ? अँथ्रोपिकच्या दाव्यानं जगात खळबळ  META AI
मुंबई/पुणे

AI News : AI माणसाला संपवणार? AI विरुद्ध मानवाचं युद्ध अटळ? अँथ्रोपिकच्या दाव्यानं जगात खळबळ

AI Tech News : Anthropic चे Alignment Science Lead Evan Hubinger यांनी पुढील दशकात AI मुळे मानवजातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता १० टक्क्यांहून अधिक असल्याचं वैयक्तिक मत व्यक्त केलं आहे.

Saam Tv

आधीच एआयमुळे जगावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलीय. जगात वाढता एआयचा वापर पाहता आता एका प्रसिद्ध AI कंपनीनं खळबळजनक दावा केलाय. त्यामुळे सबंध जग AI विरुद्ध मानव अशा युद्धाच्या उंबरठ्यावर आलंय.यावर अमेरिकेतल्या कंपन्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय ते जाणून घेऊयात

जगभरातील टेक कंपन्यांसाठी वरदान ठरलेलीे कृत्रिम-बुद्धिमत्ता अर्थात एआय संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक बनलीये. एकीकडे एआयचा सर्वच क्षेत्रात वेगाने विस्तार होत असताना एका एआयसंदर्भात सुरक्षा आणि संशोधन करणाऱ्या कंपनीनं खळबळजनक दावा केलाय. सुपरइंटेलिजन्स आणि स्वतःला सतत सुधारण्याच्या क्षमतेमुळे मानवजातीला धोका असल्याचा इशारा अँथ्रोपिकच्या सुरक्षा प्रमुखांनी दिलाय. अँथ्रोपिकचे वरिष्ठ संशोधक इवान हुबिंगर यांनी नेमका काय दावा केलाय ते पाहूयात...

AI कडून 10 वर्षात मानवाचा विनाश?

  • पुढील 10 वर्षांत AI मनुष्याचा अंत करण्याची शक्यता 10 टक्क्यांहून अधिक असल्याचा दावा

  • अतिप्रगत AIमुळे माणसाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो, अँथ्रोपिकच्या इवान हुबिंगर यांचा दावा

  • रिकर्सिव सेल्फ-इम्प्रूवमेंटमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते

  • AI कंपन्यांच्या अतिवेगवान शर्यतीवर आणि सुरक्षिततेच्या अपूर्ण उपायांवर चिंता व्यक्त करत रिसर्चरचा राजीनामा

  • भविष्यात सुपरइंटेलिजन्स मानवासाठी मोठं संकट ठरण्याची शक्यता

सध्या AI स्वतःहून संशोधन करून मानवांसाठी मोठा धोका निर्माण करेल, अशी शक्यता कमी आहे. मात्र, एआयमुळे पुढील दशकात संपूर्ण मानवजातीचा विनाश होण्याची शक्यता १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. आधीच AI मुळे हजारो लाखो नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यात आता हेच तंत्रज्ञान आगामी काळात मानवाच्या अस्तित्वावर घाला घालू शकतं. त्यामुळे ह्युबिंगर यांच्या दाव्यानं जगात AI विरुद्ध मानव असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT