Businessman Shot Dead in Pune Saam Tv news
मुंबई/पुणे

दुचाकीवरून आले अन् व्यापाऱ्यावर गोळ्या झाडल्या; सोनसाखळी घेऊन पसार, घटनेचा थरारक VIDEO

Businessman Shot Dead in Pune: पुण्यातील पिंपरी कॅम्प परिसरात व्यापारी तरुण भावेश कंकरानी यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबार करून आरोपींनी मृत तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली आणि घटनास्थळावरून फरार झाले.

Bhagyashree Kamble

व्यापारी तरूणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून उघडकीस आली आहे. पिंपरी कॅम्प परिसरात व्यापारी तरूणावर गोळीबार करण्यात आला. आरोपी दुचाकीवरून आले. नंतर गोळीबार करून आरोपी फरार झाले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गोळीबार केल्यानंतर त्यांनी मृत तरूणाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

भावेश कंकरानी (वय वर्ष २०) असं मृत व्यापारी तरूणाचं नाव आहे. त्यांच्यावर गोळीबार पिंपरी कॅम्प परिसरात झाला. आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवरून आले. नंतर त्यांनी आपली दुचाकी कंकरानी यांच्या दुकानासमोर थांबवली. नंतर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली. तसेच गोळीबार केला.

गोळीबार आणि सोनसाखळी चोरल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही संपू्र्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींच्या डोक्यावर हेल्मेट दिसत आहे. भावेश कंकरानी याच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या शोध घेण्यासाठी पिंपरी पोलिसांनी दहा पोलिस पथक तयार केली असल्याची माहिती आहे. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडणार; ५ राशींच्या लोकांवर लाडक्या गणरायाची कृपा होणार, वाचा रविवाराचं राशीभविष्य

Uttara Ashadha Nakshatra : धनु व मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्राची भूमिका आणि वैशिष्ट्ये

Chandra Grahan 2025: 'या' दिवशी लागणार वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या, नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT