नवी मुंबई RTO ऑफिस जवळ अवघ्या १०० रुपयात फिटनेस सर्टिफिकेट देण्याचा गोरख धंदा!
नवी मुंबई RTO ऑफिस जवळ अवघ्या १०० रुपयात फिटनेस सर्टिफिकेट देण्याचा गोरख धंदा! SaamTvNews
मुंबई/पुणे

नवी मुंबई RTO ऑफिस जवळ अवघ्या १०० रुपयात फिटनेस सर्टिफिकेट देण्याचा गोरख धंदा!

विकास मिरगणे

नवी मुंबई : अवजड वाहन धारकांसाठी परवाना काढण्यासाठी ४० वर्षावरील व्यक्तीला नवीन वाहन परवाना काढण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र लागते. प्रादेशिक परिवहन विभागाकडून मागितले जाणारे हे प्रमाणपत्र कोणतीही चाचणी न करता दिले जाते. वाशीतील RTO कार्यालयाच्या समोर गाळा क्रमांक बारा येथे एमबीबीएस डॉक्टर आहेत ते कुठल्याही प्रकारची तपासणी न करता प्रमाणपत्र देतात त्यासाठी शंभर रुपये दर आकारला जातो.

हे देखील पहा :

एक बनावट व्यक्तीला संबंधित डॉक्टरांकडे फिटनेस सर्टिफिकेटसाठी पाठवण्यात आले. त्या व्यक्तीने डॉक्टरांकडे वडिलांचं सर्टिफिकेट हवं आहे असं सांगितलं. मात्र, वडील आले नाहीत असे बोललेअसता डॉक्टर बोलले काही हरकत नाही. "त्यांना चालता बोलता येतं का? किंवा त्यांचा फोटो असल्यास आपल्याला फिटनेस सर्टिफिकेट मिळून जाईल" असे संबंधित डॉक्टरने सांगितले. त्या व्यक्तीने आग्रह केला की आम्ही सोमवारी येतो वडिलांना घेऊन तेव्हा डॉक्टर बोलले तुम्ही फोटो दाखवा तुम्हाला लगेच मिळून जाईल.

मात्र, डॉक्टरचा हा संवाद आता प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. मालवाहू वाहनासाठी वाहन परवाना घेणारी व्यक्ती शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असते. मात्र वाशी RTO कार्यालयाच्या बाजूला असलेले डॉक्टर कुठलीही तपासणी न करता केवळ १०० रुपयांत फिटनेस सर्टिफिकेट देत असतील तर गंभीर बाब आहे. आता या डॉक्टरांवर कारवाई होईल का हे बघणे गरजेचे आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

SCROLL FOR NEXT