पुण्यातील घरफोड्या चोर अटकेत; 30 घटना उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यातील घरफोड्या चोर अटकेत; 30 घटना उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील वेगवेगळ्या भागातील बंद घरांची रेकी करुन घरफोड्या करणाऱ्या एक सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनीटने बेड्या ठोकल्या आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे : पुण्यातील वेगवेगळ्या भागातील बंद घरांची रेकी करुन घरफोड्या करणाऱ्या एक सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनीटने बेड्या ठोकल्या आहे. आरोपीकडून आत्तापर्यंत घरफोडीच्या 30 घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी (Police) त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, कार असा 31 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी (वय 44, रा. मांजरी बुद्रूक) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या युनीट सहाच्या पथकाकडूंन सुरू होता. (Pune Crime Branch News In Marathi)

घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अर्जुनसिंग दुधानी याने त्याच्या साथीदारांसह संबंधित घरफोडीच्या घटना केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनीट सहाचे पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने त्यास सापळा रचून अटक त्या गँगला अटक केली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडीचे तब्बल 30 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, कार असा एकूण 31 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

Edited By: Pravin Dhamale

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या सौंदर्याने केली जादू; फोटो पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

Astrology Alert: मंदिरात चेंगराचेंगरी, रेल्वेची भयानक दुर्घटना; पुढील ५ महिने धोक्याचे, ज्योतिषाची चेतावणी

Crime News : डॉलर्स एक्स्चेंजच्या आमिषाने महिलेची फसवणूक; १ लाख रुपये घेऊन पसार, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kiran Mane : "लै लै लै भारी वाटलं..."; किरण माने यांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, नव्या गाडीसोबत फोटो केला शेअर

SCROLL FOR NEXT