Bulli Bai App: ...त्यामुळे बुली बाई प्रकरणातील आरोपींपर्यंत पोलिस वेळेत पोहचले नाहीत Saam TV
मुंबई/पुणे

Bulli Bai App: ...त्यामुळे बुली बाई प्रकरणातील आरोपींपर्यंत पोलिस वेळेत पोहचले नाहीत

'ट्विटरची महिला सुरक्षेबाबत अतिशय कडक मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि ते तपास यंत्रणांना सहकार्य करतात, मात्र या प्रकरणात 10 वेळा मुंबई पोलिसांनी ट्विटरकडून माहिती मागितली.'

सुरज सावंत

मुंबई : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सायबर सेल बुली बाई प्रकरणातला आरोपी नीरज बिश्नोई यांच्यापर्यंत वेळेत का पोहचू शकले नाही, याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी श्वेता सिंग, विशाल कुमार झा आणि मयंक रावल या तिघांना अटक केली होती. चौकशीत नीरजचा सहभाग निश्चित झाला होता. जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा दुसऱ्याच क्षणी म्हणजेच 2 जानेवारीला पोलिसांनी ट्विटरवर @Giyu44 बद्दल माहिती ट्विटरकडे मागितली होती, परंतु ट्विटरने (Twitter) ही माहिती मुंबई पोलिसांना तातडीने शेअर केली नाही.

ट्विटरने पोलिसांना माहिती शेअर केली नाही -

बिश्नोई हा @giyu44 नावाचे ट्विटर हँडल चालवायचा. ट्विटरने त्याची माहिती पोलिसांना वेळेत सांगितली असती तर आरोपी त्याच दिवशी तुरुंगात गेला असता असे मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्विटरची महिला सुरक्षेबाबत अतिशय कडक मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि ते तपास यंत्रणांना सहकार्य करतात, मात्र या प्रकरणात 10 वेळा मुंबई पोलिसांनी ट्विटरकडून माहिती मागितली, मात्र ट्विटरने ती माहिती पोलिसांना शेअर केली नाही. पोलीस ट्विटरच्या मुंबईतील अधिकाऱ्याच्या संपर्कात होते पण पोलिसांना हवे तसे सहकार्य ट्विटरकडून मिळालं नाही.

आरोपी गियूचा चाहता !

आसाममधून अटक करण्यात आलेल्या बिश्नोईला गियू नावाच्या अॅनिमेशन पात्राचा चाहता होता, पोलिस सूत्रांनी सांगितले की बिश्नोई त्याच्या प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फक्त गियूचे फोटो वापरतो. गियू हे जपानी अॅनिमेशन पात्र आहे.

दरम्यान खालील प्रमाणे आरोपीने पोलिसांना चकमा दिला आहे -

बुली बाई (Bulli Bai) प्रकरणातील आरोपी निरज बिश्नोईने (Niraj Bishnoi) याआधी गियू अकाऊंटच्या सुरुवातीला विविध ट्विटर हँडल तयार केले होते, जे एक गेमिंग पात्र आहे. जे खालीलप्रमाणे आहेत: -

a @giyu2002

b @giyu007

c @giyuu84

d @giyu94

e @giyu44

हे देखील पहा -

दरम्यान @giyu2002 हे खाते पीएस-किशनगड, दक्षिण पश्चिम दिल्ली येथे नोंदवलेल्या एका एफआयआरशी संबंधित आढळले आहे. या प्रकरणात, या ट्विटर अकाऊंटवरून, त्याने तक्रारदाराच्या फोटोवर अश्लील टिप्पणी केली होती आणि त्याच्या लिलावाबद्दल ट्विट देखील केले होते. त्यानंतर @giyu44 हे खाते, जे त्याने 3 जानेवारी 2022 रोजी मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेला चुकीचे ठरवण्यासाठी आणि त्यांना पकडणाऱ्या मुंबई पोलिसांना खुले आव्हान देण्यासाठी विशिष्ट अजेंड्यासह तयार केले होते. यामध्ये त्याने तो नेपाळमधील व्यक्ती असल्याचा प्रयत्न केला होता.

मात्सुर ली डील प्रकरणाची चौकशी सुरू असताना @giyu007 हे खाते उघडकीस आले. या हँडलद्वारे, त्याने सुली डील्स (sulli Deals) अॅपच्या संभाव्य प्रसारक/प्रवर्तकाविषयी काही माहिती लावण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने एका तरुणीचे बनावट प्रोफाइल तयार करून तपास यंत्रणेला वार्ताहर म्हणून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पुढे, तो विविध वृत्तनिवेदकाच्या संपर्कात आला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT