Bullock cart race दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

Video: बैलगाडा घाटात पुन्हा भिर्रर्रची आरोळी, बैलगाडा प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण

दिलीप कांबळे

मावळ - मोठ्या प्रतीक्षेनंतर बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाली. सुप्रीम कोर्टने दिलेल्या निर्णयानंतर आज अखेर मावळात (Maval) बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) सुरुवात झाली. बैलगाडा शर्यतीची पहिली बारी आज मावळात झाली. सकाळपासूनच बैलगाडा प्रेमी आणि मालक मोठ्या संख्येने नानोली येथे दाखल झाले आणि नऊ वाजण्याच्या सुमारास घाटावरून शर्यतींना सुरुवात झाली आणि मावळमध्ये अखेर भिर्रर्रर्रर्र झालं.

गेले आठ वर्ष शर्यत बंद असल्याने बैलगाडा प्रेमींचा उत्साह अधिक होता.त्यामुळे बैलगाडा मालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.मात्र या नानोलीच्या बैलगाडा घाटावर बैलगाडा शौकिनांनी एकच गर्दी केली. दरम्यान आज आणि उद्या अशी दोन दिवस शर्यत असणार आहे त्यामुळे बैलगाडा शौकीन यांना उद्याही शर्यत बघण्याची मेजवानी मिळणार आहे. या बैलगाडा शर्यतीचे आयोजन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे याच ठिकाणाहून आढावा घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

SCROLL FOR NEXT