Bulldozers Roll Over 36 Illegal Bungalows in Pimpari Chinchwad Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri-Chinchwad: ३६ बंगल्यांवर बुलडोझर चालवला, 'इंद्रायणी'ने घेतला मोकळा श्वास

Bulldozers Roll Over 36 Illegal Bungalows: पिंपरी -चिंचवडमध्ये ३६ अनधिकृत बंगल्यावर पालिकेने बुलडोझर फिरवला. इंद्रायणी नदीपात्रात हे बंगले असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने ही मोठी कारवाई केली आहे.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी- चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत बंगल्यांविरोधात महापालिकेने मोठी कारवाी केली. निळ्या पूर रेषेत उभारण्यात आलेल्या ३६ अनधिकृत बंगल्यांवर पालिकेने बुलडोझर चालवला. आज सकाळपासून पिंपरी- चिंचवड महापालिका मोठी विश्लेषणाची कारवाई करत आहे. हे सर्व बंगले जमिनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता इंद्रायणी नदीपात्र मोकळे झाले.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका आज चिखली येथील इंद्रायणी नदी पात्रात उभारण्यात आलेल्या जवळपास ३६ बंगल्यांवर बुलडोझर चालवत आहे. चिखली येथील इंद्रायणी नदीपात्रात झरे वर्ल्ड बिल्डरकडून निळ्या पूर रेषेत अनधिकृत ओपन प्लॉटिंग करण्यात आली होती. या ओपन प्लॉटिंगवर जवळपास ३६ जागा मालकांनी कोट्यावधी रुपये खर्च करून आलिशान बंगले बांधले होते.

हे बंगले नदीपात्रातील निळ्या पूर रेषेत अनधिकृत पणे उभारण्यात आल्याने या प्रकरणात तक्रारदार आणि बंगले मालक हे राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात गेले होते. या खटलाच्या अंतिम सर्वोच्च न्यायालयाने ३१ मे २०२५ पर्यंत सर्व अनधिकृत बंगले पाडून नदीपात्रातील भराव आणि राडारोडा पूर्णपणे उचलण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आज पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने या अनधिकृत बंगल्यांवर कारवाई सुरू केली. आज बंगल्यांवर बुलडोझर चालवण्याची मोठी कारवाई करण्यात येत आहे. या तोडकाम कारवाईमध्ये पालिकेचे कर्मचारी मोठ्यासंख्येत सहभागी झाले आहेत. या कारवाईमुळे या बंगल्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT