Buldhana News  Saam tv
मुंबई/पुणे

Buldhana News : अजित पवारांना मोठा धक्का; बाजार समितीच्या १३ सदस्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव, नेमकं काय घडलं?

Buldhana Political News : अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. खामगावच्या बाजार समितीच्या १३ सदस्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

संजय जाधव

खामगावतील कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकारणात खळबळ

१३ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून अविश्वास प्रस्ताव सादर

खामगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहू लागले राजकारणाचे वारे

बुलढाण्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील स्थानिक नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सभापतींवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

बाजार समितीमधील 18 पैकी 13 सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करून अज्ञातवासात गेले. काँग्रेस नेत्याने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला भाजपची साथ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी खामगावात राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम विदर्भात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तर स्थानिक राष्ट्रवादीचे नेते दिलीप कुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालत होता.

या कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १८ सदस्य आहेत. तर सुभाष पेसोडे हे राष्ट्रवादीचे सभापती आहेत. मात्र आज खामगावच्या राजकारणात मोठे खळबळ होत 18 पैकी 13 सदस्य हे काँग्रेसच्या ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटून अविश्वास प्रस्ताव दाखल करून अज्ञात वासात निघून गेले.

येत्या 14 तारखेला या अविश्वासावर मतदान होणार आहे. अविश्वास प्रस्ताव पारित होऊन आता भाजपच्या साथीने काँग्रेसची सत्ता या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाला आहे.

अज्ञातवासात गेलेल्या सदस्यांची पक्षीय संख्या

काँग्रेस - 6

राष्ट्रवादी (SP ) - 2

वंचित - 3

भाजपा - 1

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: सांगलीत पावसाने दडी मारल्याने भात पीक धोक्यात

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

SCROLL FOR NEXT