Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: महाराष्ट्रात चाललंय काय? डोकं, हात-पाय कापून धड नदीत फेकलं, पुण्यात तरुणीची निर्घृण हत्या

Pune Crime News: आता बातमी महाराष्ट्राला हादरवणारी... पुण्यात एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीये...तरुणीचे डोके, हात, पाय कापून धड मुळा-मुठा नदीपात्रात फेकलंय.

Girish Nikam

बदलापूरमध्ये चिमुरडींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच पुणे, कोल्हापूर, चंद्रपूरमध्ये मुली, तरुणींवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चोहोबाजूनी पोलिस यंत्रणांच्या कार्यशैलीबाबत संताप व्यक्त होतोय.

हे कमी होतं की काय पुण्यात सगळ्यांनाच हादरवणारी घटना घडली आहे. खराडी येथील नदीपात्रालगत एका तरुणीचे फक्त धड आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या तरुणीची दोन-तीन दिवसांपूर्वी हत्या झाल्याचा अंदाज आहे. आरोपीला पकडण्याचं मोठ आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. गुन्हेगारांवर लगाम नाही, अशी अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हत्या करुन मृतदेह नदीपात्रात टाकणा-या आरोपीपर्यंत पोलिस पोचतीलच...मात्र ड्रग्ज रॅकेट, ड्रंक अँण्ड ड्राईव्ह आणि कोयता गँगचा धुमाकूळ सुरु असलेल्या पुण्यात पोलिसांचा खुळखुळा झाल्यामुळे गुन्हेगारांना थोडासाही धाक राहिला नाही हेही तेव्हढंचं खरं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतील आश्चर्यकारक ५ बदल

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT