Pune Violence Video Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: भावकीच्या वादातून तुंबळ हाणामारी, एकमेकांवर कोयत्याने सपासप वार; तिघे गंभीर जखमी; थरारक VIDEO

Pune Violence Video: पुण्यामध्ये जमिनीच्या वादातून दोन कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेमध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

पुण्याच्या शिरूरमध्ये भावकीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली. या वादातून एकमेकांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या घटनेमध्ये तिघे जण गंभीर जखमी झालेत आहेत. ही घटना पुण्याच्या शिरूरमध्ये घडली. या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील निर्वी गावात भावकीत तुंबळ हाणामारी झाली. कुटुंबातील महिला पुरुषआमने-सामने आले. यावेळी कोयत्याने एकमेकांवर जिवघेणा हल्ला करण्यात आला. जमीनीच्या वादातून भावकीत हाणामारी झाली. दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले. यावेळी चार दुचाकींचे नुकसान झाले. या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

रायगडच्या कर्जतमध्ये घरातील किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच्या वेळी घराचा दरवाजा तोडून, घरात घुसून चार जणांना गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आली. धाकटे वेणगाव येथील शिंदे कुटूंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये प्रतीक शिंदे, सतिष शिंदे, प्रफुल्ल शिंदे आणि प्रतिभा शिंदे हे चौघे जण जखमी झाले आहेत.

या प्रकरणी शिंदे कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार आरोपी किरण शिंदे, मंगेश जाधव, जय साबळे आणि इतर दोन अनोळखी तरुणांनी फिर्यादी प्रतिक शिंदे यांच्या घराच्या कुटुंबावर हल्लाकेला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही - रामदास आठवले

व्होटी चोरीचा मुद्दा पप्पूपर्यंत पोहचला, राजकारणात आणखी किती पप्पू?

Ritesh Meshram Case: रितेश मेश्राम प्रकरणात मोठी कारवाई, हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या ८ पोलिसांचे निलंबन

Tuesday Horoscope : देव दिवाळीला धनलाभाचा योग; ५ राशींच्या लोकांवर महालक्ष्मी प्रसन्न होणार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो 'या' तारखेपर्यंत करा e-KYC, मंत्री आदिती तटकरेंनी दिली अखेरची मुदत

SCROLL FOR NEXT