Medical College Saam Digital
मुंबई/पुणे

Medical College: जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मातांसाठी सुरू होणार स्तनपान कक्ष , राज्य शासनाचे आदेश

Medical College, Hospital: सार्वजनिक ठिकाणे आणि कार्यालयांमध्ये हिरकरणी कक्ष (स्तनपान कक्ष) उभारण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत.

Sandeep Gawade

Medical College

सार्वजनिक ठिकाणे आणि कार्यालयांमध्ये हिरकरणी कक्ष (स्तनपान कक्ष) उभारण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. महाराष्ट्र राज्य सामाजिक सेवा अधीक्षक संघटनेने शासकीय रुग्णालयांमध्ये स्तनपान कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक महिला आपल्या बाळांना उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन येत असतात, पण रुग्णालयात आडोसा नसल्याने बाळांना स्तनपान करणे शक्य नसते. त्यामुळे बाळाची उपासमार होते. त्यामुळे मुंबईतील काही शासकीय रुग्णालयांमध्ये स्तनपान कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने महाराष्ट्र राज्य सामाजिक सेवा अधीक्षक संघटनेने शासकीय रुग्णालयांमध्ये स्तनपान कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी सांगितले, की मुंबईतील जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, कामा रुग्णालय आणि वांद्रे हेल्थ सेंटरमध्ये आतापर्यंत स्तनपान केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यानंतर सातारा सिव्हिल रुग्णालय आणि पालघर सिव्हिल रुग्णालयात स्तनपान कक्षांचे काम करायचे आहे. चाईल्ड हेल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून हे केंद्र बांधण्यात येणार आहे. स्तनपान केंद्र सुरू करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून फक्त जागेची मागणी केली जाते. जागा दिल्यावर संस्था विविध कंपन्यांच्या सीएसआर निधीचा वापर करून त्या ठिकाणी डायमंड रूमची स्थापना करते. या खोलीत महिलेला स्तनपान देण्यासाठी आरामदायी खुर्ची आणि व्हेंटिलेशन देण्याची विशेष काळजी घेतली जाते. या खोलीत एका वेळी १० पेक्षा जास्त माता आपल्या बाळांना स्तनपान करू शकतात, असेही गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : आष्टीत पोस्टल मतदानात दबावतंत्र; राम खाडे यांचा आरोप, निवडणूक विभागाकडे तक्रार

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT