Maharashtra Political News Saam tv
मुंबई/पुणे

Political News : मुंबईतील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai Political News : विक्रोळी पूर्वेतील टागोर नगर परिसरात युवासेना पदाधिकारी गणेश रोकडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती. तक्रारीनंतर पोलिसांचा तपास सुरू असून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याचे समजते.

Alisha Khedekar

  • मुंबईतील राजकारणात खळबळ उडवणारी बातमी

  • विक्रोळी पूर्वेतील टागोर नगर परिसरात युवासेना पदाधिकारी गणेश रोकडे यांना जीवे मारण्याची धमकी

  • २६ सप्टेंबर रोजी दुपारी भारत गॅस परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती

  • एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती

मयूर राणे, मुंबई

मुंबईच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. विक्रोळी पूर्व येथील टागोर नगर, ग्रुप क्रमांक ८ परिसरात युवासेना पदाधिकारी गणेश गौतम रोकडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. २६ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान भारत गॅस परिसरात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रोकडे हे मागील वर्षभरापासून विक्रोळी परिसरातील कथित ड्रग्सविरोधी कारवायांसंदर्भात संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करत असून, त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या तक्रारींच्या आधारे संबंधित यंत्रणांकडून कारवाईही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर रोकडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

धमकीची घटना समोर आल्यानंतर रोकडे यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत विक्रोळी पोलिसांनी तातडीने दखल घेत तपास सुरू केला. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारही नोंद करण्यात आली असून, धमकी देण्यामागील नेमके कारण काय आहे, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, संबंधित व्यक्तीचा या घटनेतील नेमका सहभाग, धमकीचे कारण तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. तसेच रोकडे यांनी यापूर्वी केलेल्या ड्रग्सविरोधी तक्रारी आणि सद्य घटनेचा काही संबंध आहे का, या दिशेनेही तपास केला जात असल्याचे समजते. या घटनेमुळे विक्रोळी परिसरात सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती आणि धमकीमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोपीचंद पडळकरांना,डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात - चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना मिश्किल टोला

बॉलीवूड अभिनेत्याला देश सोडून जायला सांगितलं; त्याने हायकोर्टात धाव घेतली|VIDEO

Car Neutral or First Gear: ट्रॅफिक सिग्नलवर कार न्यूट्रलमध्ये ठेवावी की गिअरमध्ये?

रेल्वे ट्रॅकजवळच्या झोपड्या हटवणार; 3500 लोकांना घरे रिकामी करण्याची नोटीस, कुठे होणार कारवाई? VIDEO

ट्रेनमध्ये प्रवासात मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास वसूल करणार दंड, काय आहे नियम?

SCROLL FOR NEXT