Breaking News Eknath Shinde government lifted moratorium on development works Maha Vikas Aghadi  saam tv
मुंबई/पुणे

Breaking News: कोर्टाच्या दणक्यानंतर शिंदे सरकारचं एक पाऊल मागे; मविआच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती उठवली

Maharashtra Breaking News: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती.

Satish Daud

Maharashtra Politics Latest News

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने बुधवारी (४ ऑक्टोबर) हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. सत्तांतरानंतर विकासकामांना स्थगिती देण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं राज्य सरकारने कोर्टात सांगितलं आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे मुंबई हायकोर्टाने याप्रकरणातील ८४ याचिका निकाली काढल्या आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेल्या निधीचा फेरविचार करण्याचा सरकारला अधिकार आहे, की नाही याबाबत न्यायालयाने या याचिका निकाली काढताना भाष्य केलेले नाही.

महाविकासआघाडीने मंजूर केलेल्या राज्यातील विकास कामांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात राज्यभरातून हायकोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. हायकोर्टाकडून देखील या याचिकांची गंभीर दखल घेण्यात आली होती.

एकदा विकासकामांना मंजुरी दिल्यानंतर सरकार बदललं म्हणून स्थगिती कशी दिली जाऊ शकतं, असा सवाल उपस्थित करत हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलं होतं. राज्य सरकारचा असला कारभार योग्य नसून, आम्ही तो मान्य करणार नाही. राज्यात असा चुकीचा पायंडा आम्ही पाडू देऊ इच्छित नाही, असे खडे बोल कोर्टाने सरकारला सुनावले होते.

मुख्यमंत्री अश्याप्रकारे स्थगितीचे तोंडी आदेश केस देतात? आणि त्याची तातडीनं विविध खात्यांचे सचिव अंमलबजावणी कशी करतात?, हे प्रकार आम्ही खपून घेणार नाही, असं म्हणत हायकोर्टानं शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच फटकारलं होतं. इतकंच नाही, तर विकासकामांवरील स्थगिती उठवण्याचे आदेश देखील दिले होते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT