Aaditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray: ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये, आदित्य ठाकरेंच्या हस्ते 2 प्लांटचे उद्घाटन

BPCL आणि मुंबई महापालिका ऑक्सिजन प्लांटचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : BPCL आणि मुंबई महापालिका ऑक्सिजन प्लांटचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. माहुल आणि महालक्ष्मी रेसकोर्स जवळील ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लेटर ऑक्सिजनची मोठी कमतरता होती. ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता 2 प्लांट उभारले गेले आहेत. कोव्हिड काळात ऑक्सिजनवरुन इतर महापालिकेशी वाद झाले होते.पुढे तुटवडा मुंबईत होऊ नये याची खबरदारी म्हणून 2 प्लांटचे उद्घाटन करण्यात आलेय (BPCL and BMC Oxygen Plant inaugurated by Aditya Thackeray).

ऑक्सिजन कमतरता जाणवू नये, अशी प्रार्थना - आदित्य ठाकरे

ऑक्सिजन (Oxygen) वर किती खर्च करायचा यावर समीकरण सुरू होतं. ऑक्सिजनची गरज होती. अनेक कंपन्या पुढे आल्या. मला कोव्हिड होता. ऑक्सिजन बेड नव्हते बिकट परिस्थिती होती. आपण CSR प्लांटने पण उपलब्ध केले. अनेक प्लांटची क्षमता अर्धी होती. त्यावेळी बोटलिंग प्लांट आणि ऑक्सिजन प्लांट उभं करु शकतो का याचा विचार करत होतो.

श्वास लागतो आणि त्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन कमतरता जाणवू नये, अशी प्रार्थना आहे. कोव्हिड आणि नॉन कोव्हिडला पण ऑक्सिजन लागतो. 700 मेट्रिक टन ऑक्सिजन गरजपर्यंत पोहोचतो तर निर्बंध वाढवावे लागतील. ओमिक्रॉन आणि डेल्टा असेल तर आपण काळजी गरजेचे आहे. ही लढाई कोव्हिडची स्पिरिट ऑफ मुंबई आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सोलापूर उत्तर मधून विजयकुमार देशमुख आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT