borivali grp arrested two youth from dharavi. saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Borivali GRP: मुंबईत लोकलमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या धारावीतील दाेघांना अटक

डब्यात घुसून चालत्या ट्रेनमध्ये केली हाेती मारहाण.

चेतन इंगळे

बोरिवली : मुंबईत (mumbai) लोकलमध्ये (local train) रात्री उशिरा प्रवासादरम्यान प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना मुंबई बोरिवलीच्या जीआरपीने (mumbai borivali grp) अटक केली आहे. पाेलीसांनी (police) अटक (arrest) केलेल्या दोन्ही संशयित आरोपी धारावीतील आहेत. या दाेघांवर दरोडा आणि खुनाचा प्रयत्न असे यापुर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पाेलीसांनी दिली. (borivali latest marathi news)

बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात मीरा रोड येथील रहिवासी असलेल्या शंभूलाल शर्मा यांनी नुकतीच तक्रार केली हाेती. या तक्रारीत शर्मा यांनी दुपारी एक वाजता मालाड ते भाईंदर लोकलच्या डब्यातून एकटेच प्रवास करत असताना, तिघेजण बसले. डब्यात घुसून चालत्या ट्रेनमध्ये मारहाण केली. त्यांनी माझे 1200 रुपये व मोबाईल हिसकावून पळ काढला.

बोरिवलीचे तपास अधिकारी एपीआय पाटील आणि त्यांच्या पथकाने मुख्य संशयित आरोपी मायकल कनक (२२), शनी सिप्रे (१९, दोघे रा. धारावी) यांना अटक केली. यामधील तिस-या संशयित आरोपी आकाश घोडके (२३) याचा शाेध सुरु असल्याची माहिती अनिल कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बोरिवली जीआरपी) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT