anil deshmukh, nawab malik, mlc election, breaking news saam tv
मुंबई/पुणे

मुंबई उच्च न्यायालयाचा 'मविआ' स दणका; देशमुख, मलिकांची मतदानाची इच्छा मावळली

या निर्णयामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.

Siddharth Latkar

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची संधी मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) धाव घेतलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दाेन्ही नेत्यांची मुंबई उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) मागणी फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील (mva) माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांना विधान परिषद निवडणुकीत (mlc election) यांना मतदान करता येणार नाही हे निश्चित झाले आहे. (mlc election latest marathi news)

विधान परिषदेच्या निवडणुकीत (mlc election) मतदानाची संधी मिळावी यासाठी ईडीच्या काेठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी सोमवारी एक दिवसाच्या जातमुचलक्यावर सोडण्याची विनंती करणारा अंतरिम अर्ज मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) दाखल केला हाेता.

न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात देशमुख यांनी सकाळी ९ ते ६ या वेळेत विधानभवनात एस्कॉर्टमध्ये जाऊन मतदान करण्याची परवानगी मागितली आहे. गुरुवारी देशमुख यांच्या अर्जावर त्यांच्या वकीलांनी जाेरदार युक्तीवाद केला हाेता. त्यानंतर न्यायाधिशांनी उद्या (म्हणजे आज निकाल देण्यात येईल) असे स्पष्ट केले हाेते.

न्यायमुर्ती एन. जे. जमादार यांनी कैद्यांना मतदानाचा अधिकार नसल्याने देशमुख आणि मलिक यांचा मतदानाचा हक्क नाकारला. दरम्यान गत आठवड्यातच विशेष पीएमएलए न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी तात्पुरती मुक्तता करण्याबाबत मागणी केली हाेती. संबंधित परवानगीचा अर्ज न्यायालयाने नाकारला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा! मुंबई- पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडोर सुरु करणार

Union Budget 2026: रुग्णांना दिलासा! मधुमेह आणि कॅन्सरची औषधं स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये तलवारीच्या म्यानमध्ये ३३ ड्रग्ज पुड्या

Cigarette Price Hike: सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या किंमतीत वाढ! एका सिगारेटसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Budget : काय स्वस्त आणि काय महाग? स्मार्टफोनपासून ते होमलोन, या १० गोष्टींकडे लक्ष

SCROLL FOR NEXT