anil deshmukh  saam tv
मुंबई/पुणे

Anil Deshmukh : अखेर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर; तब्बल १३ महिन्यानंतर तुरूंगाबाहेर येणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Anil Deshmukh Granted Bail : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. तब्बल १३ महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. एक लाखांच्या जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख तुरूंगाबाहेर येतील. दरम्यान, अनिल देशमुख यांना जामीन मंजूर होताच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालयाने (ED) त्यांना वर्षभरापूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली. तेव्हापासून अनिल देशमुख हे आर्थर रोड तुरूंगात होते. मध्यंतरीच्या काळात तुरूंगात त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर देशमुख यांना उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, आज मुंबई हायकोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये देशमुख यांना याधीच जामीन मिळालेला आहे. मात्र, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांत मुंबई सत्र न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली होती. याबाबत सुनावणी पूर्ण झाली असून दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने यावर निकाल दिला आहे.

दरम्यान, १०० कोटी वसुली प्रकरणामध्ये देशमुखांवर खोटे आरोप केल्याचा युक्तीवाद देशमुख यांच्या वकिलांनी आज कोर्टात केला. या प्रकरणामध्ये कुठलाही पुरावा नसताना आरोप करण्यात आलेले. या प्रकरणात २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये बेकायदेशीरपणे अनिल देशमुख यांना अटक करण्यात आलेली. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद आम्ही न्यायालयासमोर केल्याची माहिती देशमुख यांच्या वकील विक्रम चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी बळीराजाच्या खात्यात ₹२००० जमा होण्याची शक्यता

Municipal Elections Voting Live updates : तेजस्वी घोसाळकरांनी बजावला मतदानाचा अधिकार

मोठी बातमी! मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला, मनसे उमेदवारासमोर भंडाफोड, वाचा नेमकं झालं काय?

Post Office Scheme: पोस्टाची सुपरहीट योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून महिन्याला ₹५५०० मिळवा

Bigg Boss Marathi 6 : नॉमिनेशन टास्कमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा; कोणी कापली कोणाची पतंग? थेट 9 सदस्य नॉमिनेट

SCROLL FOR NEXT