Pune Terrorist News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Terrorist : दहशतवादी घडवणार होते पुण्यात बॉम्बस्फोट; अटकेत असलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Pune Terrorist News : कोथरूडमध्ये पुणे पोलिसांनी २ दहशतवाद्यांना अटक केली होती.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : पुण्याच्या कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात बॉम्बस्फोट घडवायचा या दहशतवाद्यांना कट आखला होता. मात्र पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

कोथरूडमध्ये पुणे पोलिसांनी २ दहशतवाद्यांना  अटक केली होती. त्यांच्याबरोबर तिसरा दहशतवादी देखील होता, मात्र तो मागील काही दिवसांपासून फरार होता. शाहनवाज असं या फरार असलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. अल सफा या इसिसच्या धर्तीवर सुरू झालेल्या दहशतवादी संघटनेचा तो म्होरक्या आहे.

मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद हो दोन दहशतवादी पुण्यात बॉम्बस्फोट घडवणार होते. यासाठी या दोघांनी मिळून सातारा, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण आणि चाचणी देखील केली होती. (Pune News)

गोंदियातून तिसरा दहशतवादी अटक

दोन्ही दहशतवादी गोंदिया जिल्ह्यात असताना त्या ठिकाणी आणखी एका दहशतवाद्याने त्यांना आश्रय दिला होता. तसेच त्यांना आर्थिक मदत देखील केली होती. या दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसने गोंदियातून अटक केली आहे.

पुणे पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गाडी चोरताना दोन आरोपींना त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरांची झडती घेतली होती. त्यावेळी त्यांच्या घरातून पोलिसांनी आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. कोंढव्यात दोघेही भाड्याच्या घरामध्ये राहत होते. याप्रकरणी दोघांची कसून चौकशी केली असता ते दोघे दहशतवादी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT