Salman Khan's Galaxy Apartment Firing Case Update Shooters Were Arrested Saam Tv
मुंबई/पुणे

Salman Khans House Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, दोन्ही आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी

Accused in Salman Khan's Galaxy Apartment Firing Case Were Arrested | सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातच्या भूज येथून अटक केली. त्यानंतर आरोपींना मुंबईत आणण्यात आले. आज आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले.

Priya More

सचिन गाड, मुंबई

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आले. या आरोपींना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातच्या भूज येथून अटक केली. त्यानंतर आरोपींना मुंबईत आणण्यात आले. आज आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कोर्टाकडे आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) देण्याची मागणी केली. पण कोर्टाने निकाल राखून ठेवत नंतर आरोपींची रवानगी १० दिवसांच्या पोलिस कोठडीत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर आज किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात आले. या सुनावणीदरम्यान, मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. पण कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. थोड्यात वेळात कोर्ट आपला निकाल जाहीर केला. कोर्टाने आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या सुनावणीदरम्यान पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, याप्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सहभाग आहे. आरोपींना बिहार, हरियाणा, पंजाब आणि गुजरात तसंच उत्तर प्रदेश येथे न्यायचं आहे. या सुनावणी दरम्यान पोलिसांनी अनमोल बिष्णोईची पोस्ट कोर्टात वाचून दाखवली. तसंच गोळीबारासाठी वापरलेली पिस्तूल जप्त करायची असल्याचे देखील पोलिसांनी कोर्टात सांगितले.

आरोपी पनवेल फार्म हाऊसच्या जवळ घर भाड्याने घेऊन राहत आल्याचा पोलिसांनी कोर्टामध्ये खुलासा केला. सांताक्रुझ रेल्वे ट्रॅकजवळ आरोपींनी कपडे बदलले आणि त्याठिकाणावरून पसार झाले असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार केला. आरोपींनी सलमान खानच्या घरावर चार राऊंड फायरिंग केले होते. सध्या या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT