Boisar Tragic road accident 
मुंबई/पुणे

Boisar Accident : डॉक्टरचा गाडीवरचा ताबा सुटला, रूग्णालयाबाहेरच दाम्पत्याला उडवले

Boisar Tragic road accident : पालघरमधील बोईसर येथे डॉक्टरचा गाडीवरील ताबा सुटल्याने रुग्णालयाबाहेर वृद्ध दांपत्याला धडक; ७३ वर्षीय महिलेला मृत्यू, पती गंभीर जखमी. डॉक्टर डॉ. ए. के. दास यांना अटक.

Namdeo Kumbhar

Palghar hospital car crash : पालघरमधील बोईसर येथे डॉक्टरच्या गाडीखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा पती गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी बोईसरच्या बीएआरसी (तारापूर अनुविद्युत केंद्र रहिवासी संकुल) मध्ये हा भीषण अपघात झाला. डॉक्टर ए .के. दास याचं गाडीवरून नियंत्रण सुटल्याने रुग्णालयातून बाहेर येणाऱ्या वृद्ध दांपत्याला 15 ते 20 फूट फरफटात नेल्याची माहिती मिळाली. वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या दाम्पत्याला चिरडलं . अपघातात वृद्ध महिला छायालता विश्वनाथ आरेकर (73) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला आहे. डॉक्टरला बोईसर पोलिसांनी अटक केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीसाठी वृद्ध दांपत्य रुग्णालयात आले होते. उपचार घेतल्यानंतर रुग्णालयाबाहेर पडत असताना डॉ. ए.के. दास यांच्या गाडीने जोरदार धडक दिली. दास यांचे गाडीवरून नियंत्रण सुटले. यामुळे गाडीने दांपत्याला धडक दिली आणि त्यांना 15 ते 20 फूट फरफटत नेले. या भीषण अपघातात छायालता विश्वनाथ आरेकर (वय 73) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती गंभीर जखमी झाले. जखमी पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बोईसर पोलिसांनी डॉ. ए.के. दास यांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. दास यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT