pune crime 
मुंबई/पुणे

बॉयफ्रेंडच्या भावाला वाचवण्यासाठी तरूणी बनली तोतया पोलीस; स्वतःच फसली

तोतया महिला पोलीस असल्याचे बनाव

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरात प्रियकराच्या भावाला वाचवण्यासाठी चक्क तोतया पोलीस कर्मचारी बनलेल्या तरुणीला भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून (Police) अटक करण्यात आली आहे. कविता प्रकाश दोडके असे तोतया महिला पोलीस बनलेल्या तरुणीचे नाव आहे. कविता दोडके हिचा प्रियकर संतोष पोटभरे यांच्या भावा विरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका सामाजिक कार्यकर्ते यांचे कार्यालय तोडफोड प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे.

हे देखील पाहा-

यामुळे भोसरी एमआयडीसी पोलीस (Police) त्याचा शोध घेत आल्याची माहिती संतोष पोटभरे याला मिळाली. त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन संतोष पोटभरे यांची प्रियसी कविता दोडके ही तोतया महिला पोलीस कर्मचारी बनून पोलिसांना जाब विचारू लागली. पोलीस ठाण्यात बाळू पोटभरे यांचा शोध का घेत आहात, तुम्हाला तो अधिकार कुणी दिला मी तुमची तक्रार वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे करणार आणि तुम्हाला बघून घेते अशी धमकी दिली.

यामुळे भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन मधील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तोतया पोलीस कर्मचारी कविता दोडके हिला आपले ओळखपत्र मागितले. तर तिने उद्धट वर्तन केले. त्यांनतर पोलीसांनी कविता दोडकेकडे अधिक तपास केल असता. तिने मी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे असे सांगितले. पोलिसांना तिच्या बोलायची आणि वागण्याची पद्धत समजताच त्यांनी तिची अधिक चौकशी केली असता ती तोतया पोलिस शिपाई असल्याची खात्री पटल्यावर तिला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकटातून यशस्वीपणे मार्ग काढाल; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार

Cyclone Montha: आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर १०० किलोमीटर स्पीडनं धडकलं चक्रीवादळ; 'मोंथा' नावाचा अर्थ काय?

Ladki Bahin Yojana: लाडकीची भरभराट, तिजोरीत खडखडाट, लाडकीसाठी वर्षाला 43 हजार कोटींचा खर्च

Satara News : डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; PSI बदनेचा पाय आणखी खोलात जाणार, पोलिसांकडून महत्वाचा तपास सुरु

PSI बदने सापडला, मोबाईल मात्र गायब, बदनेच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचं गूढ?

SCROLL FOR NEXT