BMC  Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Election: BMC वॉर्ड पुर्नरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर, 9 वॉर्ड वाढणार

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड पुर्नरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सादर करण्यात आला आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक (BMC Elections) प्रक्रीयेचे बिगुल वाजले आहे. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड पुर्नरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सादर करण्यात आला आहे. मुंबईतील वाढीव 9 वॉर्डकडे लक्ष आहे. तर वॉर्डची संख्या 227 वरुन 236 वर करण्यात आली आहे. या निवडणुकीत मुंबईतील वॉर्ड पुर्नरचनेवर राजकिय ठसा उमटण्याची शक्यता आहे (BMC ward restructuring plan submitted to Election Commission 9 wards to be added).

2011 च्या लोकसंख्येच्या (Population) आधारापेक्षा गेल्या 11 वर्षांच्या काळात वाढलेल्या नव्या इमारती, वस्त्या, आणि वाढीव नवी बांधकामे झालेल्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेचा आधार घेऊन वॉर्ड पुर्नरचना (ward restructuring) करण्यात आली आहे.

मुंबई शहर (Mumbai), पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगर याठिकाणी समसमान 3 वॉर्ड वाढवल्याची सूत्रांची माहिती आहे. शहरभागात लोअर परळ, वरळी सारख्या नवी बांधकामे आणि इमारती उभ्या राहिलेल्या परिसरात नवे वॉर्ड येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.

पूर्व उपनगरांत मानखुर्द, संघर्षनगर, माहूल याठिकाणी नवे वॉर्ड (Ward) येण्याची शक्यता आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे भागात वॉर्ड वाढवले जाण्याची शक्यता आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT